शब्दगंध'चे संमेलन यशस्वी होईल - डॉ. संजय कळमकर


मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी)  २०.९.२०२३
 साहित्य क्षेत्रात शब्दगंध ची वाटचाल अत्यंत यशस्वीपणे सुरू असून शब्दगंधला साहित्य क्षेत्रात मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे, अहमदनगर जिल्ह्यातील नव्या जुन्या साहित्यिकांचा मेळ घातल्याने पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन निश्चितच यशस्वी होईल, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ.संजय कळमकर यांनी केले.
     शब्दगंध साहित्यिक परिषद वतीने ता. ७ व ८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या पूर्वनियोजनासाठी आयोजित अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विचारपीठावर प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे चंद्रकांत पालवे, संयोजन समिती अध्यक्ष ज्ञानदेव पांडूळे, संस्थापक सुनील गोसावी, राजेंद्र उदागे, खजिनदार भगवान राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. कळमकर म्हणाले की, शब्दगंध साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने, काटेकोरपणे प्रयत्न सुरु आहेत, त्यामुळे हे संमेलन नक्कीच यशस्वी होणार आहे.
     प्रबोधिनी पठाडे, समृध्दी सुर्वे, दुर्गा कवडे, निवृत्ती श्रीमंदिलकर यांनी यावेळी कवितांचे वाचन केले. यावेळी झालेल्या चर्चेत मारूती सावंत, सरोज आल्हाट, सुभाष सोनवणे, राजेंद्र चोभे, डॉ. किशोर धनवटे, अजयकुमार पवार, बबनराव गिरी, स्वाती ठुबे, डॉ.अनिल गर्जे, प्रांजली विरकर, किशोर डोंगरे, शर्मिला गोसावी, जयश्री झरेकर, सुरेखा घोलप, शर्मिला रूपटक्के, बाळासाहेब शेंदूरकर, बाबासाहेब कुटे यांनी सहभाग घेतला. सर्व शाखांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
      राजेंद्र फंड यांनी स्वागत केले तर कार्याध्यक्ष प्रा.डॉ.अशोक कानडे यांनी आभार मानले. संमेलनातील साहित्य प्रबोधन लोकजागर यात्रा, उद्घाटन, परिसंवाद ,चर्चासत्र, कथाकथन, काव्यसंमेलन, शाहिरी जलसा, सांस्कृतिक कार्यक्रम, पारितोषिक वितरण व समारोप समारंभ याबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक मान्यवर व नवोदित साहित्यिक या संमेलनास उपस्थित राहणार असल्याने स्वागताध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व संमेलनाध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या उपस्थितीत होणारे हे संमेलन निश्चितच प्रेरणदायी होईल, असे मत प्राचार्य जी.पी. ढाकणे यांनी व्यक्त केले.
     ज्ञानदेव पांडूळे, चंद्रकांत पालवे, राजेंद्र चोभे, राजेंद्र उदागे यांनी केलेल्या सूचनांचा विचार करून नियोजन केले गेले.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा