मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) २७.९.२०२३
सजग नागरिकांना रयत समुहाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या आजूबाजूला विविध नागरी समस्या असतात. त्या आपल्याला दिसत असतात. मनात असते या सोडविल्या गेल्या पाहिजेत. कोणीतरी याकडे लक्ष द्यावे. संबंधित खात्याने हा प्रश्न सोडविला पाहिजे. पण पुढे कोणी व्हायचे. यासाठी रयत समुह आपल्याला सहकार्य करणार आहे, आपल्या सोबत आहे.
आपल्याला दिसत असलेल्या नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी, संबंधित खात्याचे लक्ष वेधून प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला थोडासा पुढाकार घ्यावा लागणार आहे.
रयत समाचार, रयत एक्स्प्रेस, मख़दूम समाचार, Rayat Samachar English समुहाच्या Citizen Watch मधे आपल्याला सहभागी करून घेण्यात येत आहे. यासाठी संबंधित समस्यांचे, प्रश्नाचे छायाचित्र, थोडक्यात माहिती व पाठविणाराचे नाव व छायचित्र 8805401800 या व्हॉटसअपवर पाठविल्यास योग्य प्रसिद्धी दिली जाईल. संबंधित खात्याचे लक्ष वेधले जाईल. त्यासोबत २/३ मिनिटांचा छोटा व्हिडिओ पाठविल्यास उत्तम होईल.
चला तर, आमच्या सोबत आपणही पत्रकार व्हा ! सामान्य नागरिक जेंव्हा पत्रकार होतो, तेंव्हा सर्व प्रश्न नक्कीच सोडविले जातात.
अशी असेल Citizen Watch: https://makhdoomsamachar.blogspot.com/2023/09/citizen-watch.html?m=1 #CitizenWatch
إرسال تعليق