शिक्षकदिनाचे औचित्य साधून कै. गुरुवर्य पोट्यन्ना बत्तिन शैक्षणिक, सामाजिक मंडळाच्या वतीने आयोजित शिक्षकांचा सत्कार व पदविका पदवीधर विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर यांनी पद्मशाली समाज महाराष्ट्राच्या मातीशी एक रूप झाला असून मराठी भाषा व मराठी संस्कृती समाजाच्या रक्तात भिनली आहे. पद्मशाली समाज हा कलाकारांचा समाज असून गणपती मूर्ती व टेलरिंग फर्म मध्ये त्यांचा नावलौकिक आहे असे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सदाशिव बत्तिन यांनी केले, तर मंडळाचे सचिव प्रा. बाळकृष्ण गोटीपामूल यांनी येलुलकर यांच्या परिचयातून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते नारायण मंगलारम यांनी राष्ट्रीय एकता पुरस्कारप्राप्त श्रीनिवास बोज्जा, शहर बँकेचे नूतन संचालक दत्तात्रय रासकोंडा, एम.पी.एस.सी. स्पर्धेतून पी.एस.आय. झालेल्या लावण्या जक्कन, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त लक्ष्मीकांत इडलवार यासारख्या विशेष पुरस्कार प्राप्त केलेल्या मान्यवरांच्या सत्काराची घोषणा केली. श्रीनिवास बोज्जा, दत्तात्रय रासकोंडा यांनी सत्कारच उत्तर दिले.
यानंतर सेवेतील सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्काराची उद्घोषणा मंडळाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर मंगलारम यांनी केली. उपशिक्षिका रंजना गोसके यांनी शिक्षक सत्कारास उत्तर दिले. पदविका पदवीधर व पदव्युत्तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पारितोषिकाची घोषणा मीना बत्तिन यांनी केली. यावेळी प्रा.वीरभद्र बत्तिन व भुमय्या नक्का यांच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तिनिमित्त यथोचित सत्कार करण्यात आला.
समारंभाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्धम यांनी, आज समाजातील असंख्य विद्यार्थी सी.ए., बी. ई., बी. टेक., बी.सी.ए. यासारख्या परीक्षेत अभूतपूर्व यश प्राप्त करून आपला शैक्षणिक दर्जा सिद्ध केला आहे तसेच प्रतिष्ठान तर्फे वर्षभर होणाऱ्या विविध समारंभ कार्यक्रमाची माहिती आपल्या मनोगतातून दिली. मंडळाचे सहसचिव कृष्णा संभार यांनी आभार तर श्रीनिवास यल्लाराम व साईगीता सब्बन यांनी सूत्रसंचालन केले. समारंभास समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनायक बत्तिन, मेघाशाम बत्तिन, कुमार आडेप, शेखर दिकोंडा, श्रीनिवास वंगारी, रघुनाथ गाजेंगी, शिवाजी संदुपटला, हनुमंत जोग, संदीप छिंदम, विष्णू रंगा, किशोर कोटा, निलेश आनंदास, सुहास बोडके, अजय न्यालपेल्ली यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment