'दांडिया क्वीन' फाल्गुनी पाठक रसिकांना पुन्हा करणार मंत्रमुग्ध; कर्करोग पीडितांसाठी २१ लाखांची देणगी देण्याचा संकल्प


मख़दूम समाचार 
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) ७.९.२०२३
'दांडिया क्वीन' या उपाधीने नावाजलेली फाल्गुनी पाठक बोरीवली येथे 'शो ग्लिट्झ इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट'द्वारे आयोजित नवरात्रोत्सवात सलग सहाव्यांदा सादरीकरण करणार आहे. लोकांच्या मागणीला मान देऊन फाल्गुनी पाठक पुन्हा एकदा गुजराती बहुल 'बोरीवली' परिसरात आपल्या आवाजाच्या जादूने गरबा-रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहे. फाल्गुनी पाठक २०१६ पासून बोरीवलीमध्ये नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम सादर करत आहे. बोरीवली येथील कै. प्रमोद महाजन मैदानामध्ये दांडिया क्वीनच्या नवरात्रीचे आयोजन करण्यात येणार आहे.

शो ग्लिट्झ इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटने बोरीवली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत फाल्गुनी पाठक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, "गेल्या वर्षी आम्ही गरबा प्रेमींसाठी एक नवीन गाणे सादर केले होते. या वर्षी रंगमंचावर तुम्हाला आणखी काय नवीन पाहायला मिळेल, हे आम्ही गुपित ठेवलं आहे. मी जगातील सर्वात मोठ्या नृत्य महोत्सवात सर्व रसिकांचे स्वागत करते.

पत्रकार परिषदेला उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते. या प्रसंगी संबोधित करताना ते म्हणाले की, "दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक बोरीवलीत सलग सहाव्यांदा सादरीकरण करणार आहे, हे उत्तर मुंबईचे भाग्यच म्हणावे लागेल. आजच्या बदलत्या काळात माणसं आपल्या गरजेच्या गोष्टींमध्ये सुद्धा झपाट्याने बदल करत आहेत, तरी देखील फाल्गुनी पाठकची क्रेझ लोकांच्या मनात आजही टिकून आहे. यावरून हेच सिद्ध होतं की इथल्या नवरात्री उत्सवात संगीतासोबत धार्मिक समन्वय देखील साधला जातो.

या प्रसंगी गोपाळ शेट्टी यांनी विद्यमान वर्षात ४ दिवस नवरात्रोत्सव मध्यरात्री १२ वाजेपर्यंत आयोजित करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती राज्य सरकारला केली आहे.

शो ग्लिट्झ इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड हे या भव्य नवरात्रोत्सवाचे आयोजक आहेत. कंपनीचे संचालक संतोष सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, "कलाकार आणि आयोजक कोणताही कार्यक्रम तेव्हाच यशस्वी करुन दाखवू शकतात, जेव्हा त्यात लोकांचा खुल्या मनाने सहभाग असतो. गेल्या पाच वर्षांत लोकांनी आम्हाला जे प्रेम दिले, ते प्रेम यावर्षी देखील मिळेल, असा आम्हांला विश्वास आहे." याप्रसंगी त्यांनी पत्रकारांना सांगितले की, या कार्यक्रमातून झालेल्या आर्थिक लाभातून कर्करोग पीडितांना २१ लाख रुपयांची देणगी देण्याचा संस्थेचा मानस आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा