धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांला मारहाण करणार्‍यांवर गुन्हा दाखल करावा

अहमदनगर - सोलापूर जिल्ह्यात धनगर आरक्षण कृती समितीचे शंकर बंगाळे या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीचे निवेदन दिले. तद्नंतर भंडारा उधळला. मात्र या प्रकारानंतर विखे समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. पोलिसांसमक्ष झालेल्या या मारहाणीचा आम्ही निषेध करत असून, संबंधितांवर दोन दिवसांत गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. 
याबाबत उचित कार्यवाही न झाल्यास जिल्हाव्यापी आंदोलन करण्यात येईल, याबाबतची प्रशासनाने नोंद घ्यावी.
तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेळी-मेंढी-मेष महामंडळची प्रस्तावित जागा ढवळपुरी, ता.पारनेर येथून बदलून अन्यत्र नेण्याच्या हालचली प्रशासकीय पातळीवर सुरु आहेत. याबाबत समाजात तीव्र असंतोष असून, समाजाचे नेते आ.प्रा.राम शिंदे, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर यांनी विधान सभेच्या अधिवेशनात मंजूर केलेला विषय कोणाच्या सांगण्यावरुन बदलला जात आहे, याही खुलासा होण्याची गरज आहे. 
अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नामांतराच्या वेळी विरोध करणार्‍यांच्या विरोधात धनगर समाज आक्रमक असल्याने अशा घटना घडत आहेत, तरी धनगरचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. 

आपला स्नेहांकित
नाव पद मोबाईल
1)काका शेळके उपजिल्हाप्रमुख 84828311919
2)सचिन डफळ मनसे जिल्हाध्यक्ष
3) राजेन्द्र तागड अध्यक्ष वधू वर मेळावा,
4)निशांत दातीर  अध्यक्ष धनगर समाज सेवा संघ 
5)भगवान जऱ्हाड प्रदेश महासचिव राष्ट्रीय जनमंच
6) अशोक होंनमने जेष्ठ नेते
7) केदार हजारे
8)संग्राम शेळके
9) अथव गंगावणे
10)वैभव घायतडक
11) अशव औटी
12) कृषा तेपले
13)राहुल देठे

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा