ऑनलाईन 'वाचन कट्टा' उपक्रमात सहभागी होण्याचे प्रविण सिंधू यांचे आवाहन


मख़दूम समाचार 
अहमदनगर (प्रतिनिधी) ९.९.२०२३
Online वाचन कट्टा
    तुमचंही नियमित वाचन होत नाही का?
तुम्हाला वाचण्यासाठी वेळच मिळत नाही का? तुमच्या अशाच तक्रारी असतील तर आवर्जून Online वाचन कट्टा उपक्रमात सहभागी व्हा. तुम्हाला केवळ कानात हेडफोन घालायचे आहे आणि मी तुमच्यासाठी पुस्तक वाचणार आहे, असे आवाहन प्रविण सिंधू यांनी केले आहे.
    दर शनिवारप्रमाणे ९ सप्टेंबरला रात्री ९ ते १० या वेळेत एका पुस्तकाचं प्रकटवाचन करणार आहे. यावेळचे पुस्तक क्रमांक ४ आहे ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे लिखित 'राजर्षी शाहू महाराज आणि महिला मुक्ती'. सुरुवातीचे ४५ मिनिटे वाचन करून उर्वरित १५ मिनिटे त्या पुस्तकावर थोडक्यात चर्चाही होईल. तुम्हाला काही विचारावं वाटलं किंवा सांगावं वाटलं तर चर्चेत सहभागी व्हाल. तुम्ही दर शनिवारी, रात्री ९ ते १० या वेळेत वाचन कट्ट्यात सहभागी होऊ शकता.
 अधिक माहिती देताना त्यांनी उपक्रमाची पार्श्वभूमी सांगितली.
     मागील काही काळापासून मी गावाकडील काही तरुणांबरोबर दर शनिवारी अभ्यास मंडळ घ्यायचो. त्यात विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करायचो. मात्र, चर्चेत अनेकदा जाणवलं की, त्या विषयाची पुरेशी माहिती नसल्याने काही सदस्यांना चर्चेला मर्यादा येतात, बोलता यायचं नाही. त्यामुळे चर्चेआधी आपलं वाचन वाढवण्याची गरज आहे हे प्रकर्षाने जाणवलं. म्हणून मग आम्ही अभ्यास मंडळाचं स्वरुप बदललं आणि यात दर आठवड्यात एक तास वाचन करावे आणि मग चर्चा करावी असा विचार डोक्यात आला. जेणेकरून आपल्या ज्ञानात भर पडेल, वाचन वाढेल आणि त्यातून दृष्टिकोन तयार होऊन पुढील काळात जेव्हा चर्चा करू तेव्हा अधिक सविस्तरपणे आपली मतं मांडता येतील तसेच वाचन कट्टा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे https://chat.whatsapp.com/KU73Mg87fu66eG3XskrEqA असे आवाहन प्रविण सिंधू यांनी केले आहे. वाचनप्रेमींनी या उपकमात नक्की सहभागी व्हावे.






Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा