पत्रकारांच्या संबंधी बोलताना केलेले विधान अत्यंत निंदणीय असून त्याचा आम्ही निषेध करतो. चहा अन् ढाबा संस्कृती जोपासणारी आणि त्यावर पत्रकारीता करणारे पत्रकार नगर जिल्ह्यात नाहीत याची आपणास पूर्णपणे माहिती आहे. तरीही आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी नगरमध्ये येऊन पत्रकारांना चहा पाजण्याचे व धाब्यावर जेवू घालण्याबाबत बुथप्रमुखांच्या बैठकीत सांगितले.
भाजपाच्या सर्व पदाधिकारी आणि बुथप्रमुखांना अध्यक्ष अनंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चहापान ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. बावनकुळे यांच्या आदेशाने तुम्ही आम्हाला चहा पाजण्याऐवजी आम्हीच तुम्हा सर्वांना चहा पाजण्याचा निर्णय घेतला असून सदर चहापान कार्यक्रमासाठी आपण व आपले सर्व पदाधिकारी, बुध प्रमुख यांनी उपस्थित राहावे ही विनंती.
चहापान कार्यक्रमाचे स्थळ
सचिन टी सेंटर (टपरी), माऊली व्यापारी संकुल, झोपडी कँटीन शेजारी, सावेडी रोड,अहमदनगर. वेळ - बुधवार दि. २७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वा.
Post a Comment