Citizen Watch
मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) २९.९.२०२३
अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील नगर कॉलेजमागील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ कार्यालयासमोर हाजी हसन कादरी कब्रस्तानच्या गेटसमोर ड्रेनेज चेंबर पूर्णपणे भरून ओसंडून वहात आहे. त्यामधून घाण पाणी गेल्या एक महिन्यापासून रस्त्यावर येते, याबाबत प्रशासनाकडे स्थानिक तरुण कार्यकर्त्यांनी निवेदनद्वारे तक्रारी केली होती मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केला आहे.
या प्रभागातील एकही नगरसेवकांचे लक्ष या समस्याकडे गेल्याचा दिसत नाही. या रस्त्यावर अहमदनगर शहरातील एका लोकप्रतिनिधीची हॉटेलही आहे, त्यांचाही या समस्येकडे दुर्लक्ष आहे. मनपाने या रस्त्याचे काम पावसाळ्यामध्ये सुरू केलेले आहे. काम करताना विविध ठिकाणी पाण्याची पाईपलाईन फुटलेले आहे व चेंबर फुटलेले आहे. याकडे बांधकाम विभागाचा एकही अभियंता फिरकत नाही. या भागाची अत्यंत दैन्य अवस्था झालेली आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. या रस्त्यावर मुस्लिम समाजाचे दोन कब्रस्तान आहेत. हाजी हसन शहा कादरी रहमतुल्ला यांची दर्गा असून तिथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भक्त मंडळी येत असतात. रस्त्यावर ड्रेनेजचा पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना जाता येत नाही.
आज एक महिलेने आपल्या नातवाला खांद्यावर बसवून प्रवास केलेला आहे तर दुसरीने दूर्गंधीमुळे साडीच्या पदराने आपले नाक झाकून घेतले आहे. त्याचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांना शूट केलेला आहे.
याविषयी शाकीर शेख म्हणाले की, महानगरपालिका आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांना थोडीफार लाज शिल्लक असेल तर हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत, अन्यथा महानगरपालिका समोर आंदोलन करण्यात येईल.
#CitizenWatch
Post a Comment