मख़दूम समाचार
मुंबई (प्रतिनिधी) १९.९.२०२३
सध्या देशात व राज्यात केंद्रातील आरएसएस बीजेपी सरकारकडून सर्व जातीधर्मांमध्ये कलह निर्माण करून दिले जात असल्याचे दिसून येते आहे. विविध जातींमधे आरक्षणावरून मनभेद करून दिलेल जात आहेत. एकिकडे कंत्राटी भरती करून आरक्षण निष्प्रभ करायचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून दुसरीकडे जातीधर्मांचे तंटेबखेडे उभेे केले जात आहेत. यावर आपले मत व्यक्त करताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, भाजप-आरएसएसचं धोरण म्हणजे SC, ST आणि OBC यांचे सार्वजनिक क्षेत्रातील, शिक्षण आणि नोकऱ्यांमधील आरक्षण दुर्बल करणे आणि संपवणे होय.
ते पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप महाराष्ट्र सरकारचा, सरकारी आस्थापनांनमध्ये विविध पदांसाठी कंत्राटी कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी, ९ खाजगी एजन्सींची नोंदणी करण्याचा निर्णय सरकारी क्षेत्रातील SC, ST आणि OBC साठी आरक्षण संपवण्याच्या अनेक पावलांपैकी एक आहे. भाजप-आरएसएस अंतर्गत आरक्षणविरोधी संघटनेला भारतातील दलित, आदिवासी आणि ओबीसींनी शिक्षित व्हावे, सामाजिक-आर्थिक उन्नती साधावी आणि सवर्णांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहावे असे वाटत नाही.
मी पुन्हा एकदा सांगतो, हे धोरण स्पष्टरुपी जातीयवादी आहे व आरक्षण दुर्बल करून ते संपवण्याचे डाव आहे, असा इशारा ॲड. आंबेडकर यांनी दिला.
إرسال تعليق