सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणाऱ्यांच्या मनामध्ये सनातनी हिंदूंचा वंशविच्छेद हेच ध्येय!- सुनील घनवट

सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणाऱ्यांच्या मनामध्ये सनातनी हिंदूंचा वंशविच्छेद हेच ध्येय!
- सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक हिंदू जनजागृती समिती

सनातन धर्म रक्षक अभियानाला आरंभ!


अहमदनगर (दि.९ ऑक्टोबर):-तामीळनाडूतील द्रवीड मुन्नेत्र कळघम या पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलीन यांनी सनातन धर्माविषयी द्वेषमुलक विधान केले. सनातन धर्माची तुलना संसर्गजन्य रोगाशी करून ते थांबले नाहीत,तर सनातन धर्म नष्टच करून टाकण्याची इच्छाही त्यांनी जाहीरपणे मांडली.सदर वक्तव्य हे हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणारे आणि सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 'हेट
स्पीच' होते.तरीही महाराष्ट्रातील पत्रकार निखिल वागळे यांनी 'उदयनिधी स्टॅलिनच्या मताशी मी
सहमत आहे.सनातन धर्म हा एखाद्या रोगासारखा असून या धर्माची उत्पत्ती असलेल्या सनातन संस्थेकडे बघा,' अशी पोस्ट फेसबुकद्वारे केली. हा एकप्रकारे सनातन धर्माचा अपमान आहे.महाराष्ट्रातील नास्तिकतावाद्यांच्या हत्येचा बादरायण संबंध धार्मिक संस्थांशी जोडून निरपराध्यांना
अडकविण्याचे कारस्थान रचणाऱ्यांमध्ये निखील वागळे अग्रणी होते.सहिष्णुतेची प्रवचने झोडून ॲवॉर्ड वापसी करणाऱ्या संधीसाधू साहित्यीकांच्या टोळीचे ते भक्त आहेत. ही 'ॲवॉर्ड' वापसी टोळी उदयनिधी स्टॅलीनच्या विधानावर चकार शब्द काढायला तयार नाही.धर्म नष्ट होऊ शकत नाही, हे सनातन सत्य आहे.धर्म नष्ट करण्याची भाषा करणाऱ्यांच्या मनामध्ये धार्मिक समुहाचा वंशविच्छेद हेच ध्येय आहे.यासाठी महाराष्ट्रातील सनातनधर्मी हिंदू समाजाने सजग होण्याची आणि लोकशाही मार्गाने या सनातन धर्मविरोधी वक्तव्यांचा प्रतिवाद करण्याची आवश्यकता आहे,असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरातील यश पॅलेस येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.या परिषदेला संतोष गवळी,हिंदू जनजागृती समिती विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे योगेश सोनवणे,हिंदु जनजागृती समितीच्या नगरजिल्हा समन्वयक प्रतीक्षा कोरगांवकर यांनी संबोधित केले.सहिष्णुता,बंधुत्व आणि विश्वकल्याण यांच्यासाठी सुपरिचित असणारा सनातन धर्म नष्ट करण्यासाठी अर्बन नक्षलवाद्यां कडून सातत्याने षडयंत्रे चालू आहेत. सर्वप्रथम जे.एन.यू.मध्ये भारतात 
हिंदुत्व संपवण्यासाठी परिषदा घेतल्या गेल्या.त्या वेळी विरोध झाल्यावर 'आम्ही हिंदू धर्माच्या तेरे टुकडे होंगे' च्या देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या.त्यानंतर 'डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व' नावाने विरोधात नाही, तर राजकीय हिंदुत्वाच्या विरोधात आहोत', असा खुलासा केला गेला; मात्र आता तर'सनातन धर्म' संपवण्याचीच भाषा केली जात आहे.ओवैसीच्या 100 कोटी हिंदूंना संपवण्याच्या भाषेपेक्षा हे वेगळे काय आहे ? 'हेटस्पीच' च्या खटल्यात सर्वाेच्च न्यायालयातील प्रतिज्ञापत्रात महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनी 30 गुन्हे नोंदवल्याचे सांगितले आहे. त्यातील बहुतांश गुन्हे सकल हिंदु समाजाच्या 'हिंदु जनआक्रोश मोर्च्यातील हिंदुत्ववादी वक्त्यांच्या विरोधात दाखल केले गेले आहेत.हे गुन्हे दाखल करण्याच्या मागे अर्बन नक्षलवाद्यांशी जोडलेल्या वामपंथी विचारसरणीच्या तिस्ता सेटलवाड यांच्या 'सिटीझन फॉर जस्टिस अॅण्ड पीस' या संघटनेचा हात आहे,मात्र याच संघटनेने स्टॅलिन, प्रियांक खर्गे,निखिल वागळे,आव्हाड इत्यादींच्या विरोधात 'हेटस्पीच'चा एकही गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे एकूणच सनातन धर्म संपवण्याचे हे डाव्या
विचारसरणीच्या अर्बन नक्षलवादयांचे षड्यंत्र असल्याचे स्पष्ट होते.त्यामुळे हे षडयंत्र करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासह त्यांची 'एन.आय.ए.' कडून चौकशी करण्यात यावी,अशी हिंदु जनजागृती समितीची मागणी आहे.
जिल्हयात ३ तालुक्यांत तक्रारी दाखल करणार ! - कु प्रतीक्षा कोरगांवकर, हिंदु जनजागृती
समिती सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणाऱ्यांच्या विरोधात सध्या समविचारी संघटनांच्या वतीने
जागृतीपर सनातन धर्मरक्षण अभियान राबवण्यात येत आहे.या अंतर्गत जागृतीसोबत धर्मविरोधी
शक्तींचा लोकशाही मार्गाने विरोधही केला जाणार आहे. नगर जिल्हयात नगर शहरासह नेवासा, श्रीरामपूर या तालुक्यांत सनातन धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये करणाऱ्यांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात येणार आहेत.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा