मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) ९.१०.२०२३
'निर्भय बनो' चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्लाप्रकरणी पोलिसांनी आज संध्याकाळी तिघांना अटक केली आहे. त्यापैका एकजण अल्पवयीन आहे. सिताराम सारडा महाविद्यालय शाळेजवळील विडी, सिगारेट, तंबाखूची पानटपरी हटविल्याच्या कारणातून हा हल्ला केल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला यातील आणखी दोन आरोपी फरारी आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे प्रथम चैतन्य सुनिल सुडके (रा. सुडकेमळा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून अक्षय विष्णू सब्बन व एक विधीसंघर्ष बालक यांना अटक केली. त्यांचे साथिदार अक्षय (पूर्ण नाव माहिती नाही) व सनी जगधने हे दोघे फरारी आहेत.
अक्षय सब्बन याची सीताराम सारडा विद्यालयाजवळ पानटपरी होती. हेरंब कुलकर्णी यांनी महापालिकेत अर्ज केल्याने ती हटविण्यात आली. या रागातून आरोपींनी हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. रयत समाचार, एक्स्प्रेस, मख़दूमच्या टीमने सकाळच्या वृत्तातच सांगितले होते की पोलिसांनी मनावर घेतले तर हल्लेखोर तात्काळ सापडू शकतात आणि अहमदनगर पोलिसांनी तात्काळ मनावर घेतल्याने हल्लेखोर पकडले गेले.
إرسال تعليق