मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) १०.९.२०२३
नुकताच सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे आयोजित पीएच.डी व्हायवा ऑनलाईन पार पडला त्यामधे ममता इंदापूरे यांनी 'दक्षिण आशियातील दहशतवादाचा अभ्यास' या संशोधन विषयात विविध घटकांचा तपशीलवार संशोधनपूर्ण अभ्यास केला. हे संशोधन त्यांनी हिंद सेवा मंडळाचे पेमराज सारडा महाविद्यालयातील राज्यशास्त्र संशोधन केंद्र येथून पूर्ण केले. संशोधनासाठी पेमराज सारडा महाविद्यालय राज्यशास्त्र विभागप्रमुख आणि संशोधन केंद्र समन्वयक प्रा. डॉ. ज्योती बिडलान यांनी मार्गदर्शन केले.
राज्यशास्त्रातील हे संशोधन भविष्यात संशोधक विद्यार्थी, अभ्यासक, शासनाला सुरक्षात्मक धोरण ठरविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे त्याचप्रमाणे दक्षिण आशियातील गरिबी, बेकारी, दारिद्रय, वाढती धर्मांधता यावर भविष्यकालीन उपाययोजना म्हणून हा प्रबंध मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरणार आहे. याअगोदर त्यांनी अहमदनगर शहरातील महिलांच्या राजकीय सहभागाचा विश्लेषणात्मक अभ्यास केलेला आहे. महिला प्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेले संशोधन सामाजिकदृष्ट्या कौतुकास्पद आहे.
त्यांच्या यशाबद्दल अहमदनगर कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस, प्राचार्य डॉ. विलास आवारी, प्राचार्य डॉ. सुनील कवडे, प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित, प्राचार्य टेमकर, प्राचार्य संजय मराठे, प्रा. सुधीर वाडेकर, प्रा. डॉ. विलास नाबदे, डॉ. प्रमोद तांबे, डॉ. अंकुश आवारी, स्नेहालय एनजीओचे डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. वहिदा शेख, डॉ. अविनाश साळवे, प्रा. जयराम इंदापूरे आदींनी अभिनंदन केले.
إرسال تعليق