मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला (जि. नाशिक) येथे धर्मांतर घोषणेची शपथ घेतली होती. त्याच्या ८८ व्या वर्धापनदिनी उद्या, शुक्रवारी दुपारी येवला येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अभिवादन सभा होणार आहे. या सभेस रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी नाशिक जिल्हयातील येवला मुक्तिभूमी येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने धर्मांतर घोषणेच्या वर्धापनदिनी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात येते.
إرسال تعليق