हिंदूंनी भारताचे नागरिकत्व का सोडले,याचा शोध सनातन धर्म प्रचारकांनी घ्यावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी लातुरात केले.
सभेत ते म्हणाले, ज्यांनी भारताचे
नागरिकत्व सोडले ते कोणी आदिवासी ओबीसी नाहीत. वर्षभरात लाखावर सवर्ण हिंदूंनी परदेशी नागरिकत्व स्विकारले आहे, त्याचाही शोध आणि बोध घेतला पाहिजे. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नाही. मात्र, नागरिकत्वाच्या मुद्द्यावर सनातनवाद्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे.
सभेत टोपीवरून अॅड. आंबेडकर
म्हणाले, आता माझ्या डोक्यावरील
टोपीवरून टीका होईल. टोपी
काढल्याने रोजगार मिळणार नाही
आणि घातल्यानेही मिळणार नाही.
إرسال تعليق