मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) ३.१०.२०२३
अहमदनगर जिल्हा मराठा समाजसेवा मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत ९५ टक्कयांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दादाभाऊ कळमकर, सचिव अनिल शिंदे, उपाध्यक्ष बापूसाहेब डोके, खजिनदार विनायक गरड, संचालक रमाकांत गाडे, शरद ठाणगे, आसाराम कावरे, जयंत वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
إرسال تعليق