आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर महागणार; कंपन्यांनी केली २०९ रुपयांनी वाढ; सरकारचा आशिर्वाद ?



मख़दूम समाचार 
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) १.१०.२०२३
 तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार म्हणजेच १ ऑक्टोबरपासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत २०९ रुपयांनी वाढणार आहे. या वाढीमुळे दिल्लीत १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १७३१.५० रुपयांना उपलब्ध होणार आहे.

१ सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती १५८ रुपयांनी कमी केल्या होत्या. यानंतर दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १,५२२ रुपयांवर आली. ऑगस्टच्या सुरुवातीलाही तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती ९९.७५ रुपयांनी कमी केल्या होत्या.

त्याचमुळे, गेल्या दोन महिन्यांत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती सुमारे २५८ रुपयांनी कमी झाल्या आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीतील ताज्या वाढीचा परिणाम महागाईवर होऊ शकतो. विशेषतः, रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा