अहमदनगर - अहमदनगर येथे काही संघटन तेलंगणाचे भाजप चे आमदार टी राजा यांना अहमदनगर येथे सभे साठी बोलवत आहे. सदर सभा अहमदनगर शहराचे माध्येभागी होणार आहे. भाजप आमदार टी राजा यांचे मागील भाषणे पहिली तर असे स्पष्ट दिसते की ज्या ज्या ठिकाणी त्यांचे भाषणे झाली तिथे तिथे जातीय तणाव वाढले असून दंगल ग्रस्त परीस्थिती निर्माण झाली आहे. याचा अहमदनगर मधिल उद्हारण म्हणजे श्रीरामपूर येथे काही महिन्यापूर्वी यांचे झालेले भाषण आहे.
अहमदनगर येथे यांचे भाषण झाल्यावर जातीय तेढ निर्माण होण्याची व दोन समाजात तेढ निर्माण होऊन दंगल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच यांचे भाषणामध्ये मुस्लीम अल्पसंख्यांक समाज यांच्या बद्दल विष पेरण्याचे अजेंडा असल्याची शक्यता आहे. त्यांचे प्रत्यक भाषणा मध्ये मुस्लीम अल्पसंख्यांक समजा बद्दल काहीही चुकीचे वक्तव्य करून सामान्य जनतेची दिशाभूल करण्याचे काम चालू असल्याचे दिसते.
हेट स्पीच करणाऱ्यावर कोणाचीही वाट न बघता गुन्हा दाखल करण्याचे मा. उच्च न्यायालय यांनी आदेश दिले आहे.
तरी आपण योग्य ती दखल घेऊन अहमदनगरचे वातावरण खराब होणार नाही तसेच अहमदनगर मध्ये जातीय तेढ निर्माण होऊन दंगल होणार नाही याची खबरदारी घेण्याची मागणी एम आय एम चे जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी निवेदनाद्वारे राष्ट्रपती, प्रधानमंत्री, गृहमंत्री,भारत सरकार व मुख्यमंत्री महाराष्ट्र, गृहमंत्री, अल्पसंख्याक आयोग महाराष्ट्र, महाराष्ट्र पोलीस महासंचालक,जिल्हाधिकारी अहमदनगर, जिल्हा पोलिस अधिक्षक, पालकमंत्री, अहमदनगर यांना केली आहे.
إرسال تعليق