राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभाग व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पाठिंबा
नगर - केडगवं येथील मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबियांनी कोतवाली पोलिस स्टेशनला रितसर दिली आहे, त्याचा मिसिंग रजि क्र.118/2023 दि.13/10/2023 हा आहे,परंतु आज दि. 2/11/2023 रोजी 21 दिवस झाले तरीही काहीच तपास लागलेला नाही. आमच्या परिसरात राहणार्या विशिष्ट समाजाच्या काही लोकांनी आम्हाला संपूर्ण परिवाराला सहा महिन्यापुर्वी जबर मारहाण केलेली होती, त्यामध्ये देखील जबर मारहाण झालेली असतांना किरकोळ स्वरुपाचा गुन्हा दाखल करु घेता आणि एक प्रकारे आरोपींना पाठिशी घालण्याचे काम झालेले आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आमच्या परिवाराचा संपूर्ण परिवाराचा संशय आहे, त्यामध्यील पहिले आरोपी बाबत देखील आम्ही लेखी तक्रार दि.18/10/2023 रोजी कोतवाली पोलिस स्टेशनला दिलेली आहे, परंतु काहीच तपास झालेला नसल्याने आम्ही शहराचे कर्तव्यदक्ष आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्याकडे धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रसंग कथन केला त्यांनी आज दि.2/11/2023 रोजी त्याबाबत अहमदनगर जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली आणि तात्काळ तपासकरिता एक टीमची मागणी केली आणि तपासाला गती देऊन लवकरात लवकर मुलगी कुटूंबियांच्या स्वाधीन करण्यास सांगितले.
तरी सोमवार दि.6/11/2023 पर्यंत मुलीचा तपास न लागल्यास दि.7/11/2023 पासून कुठलीही पूर्व सूचना न देता पोलिस धिक्षक कार्यालयासमोर सहकुटूंब उपोषणास सुरुवात करणार आहोत, या अमरण उपोषणाची दखल प्रशासनाने घ्यावी, असे पोलिस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे निलेश बांगरे व राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे शहर जिल्हा सरचिटणीस अभिजित खरात यांनी पाठिंबा दिला आहे. कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील दोन दोन बेपत्ता प्रकरणात पोलिसांनी योग्य तपास न केल्यास कुटूंबियांनी पोलिस प्रशासनाला जो उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यास आमचा पाठिंबा असून, राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुद्धा उपोषणास बसणार असल्याचे बांगरे व खरात यांनी सांगितले.
إرسال تعليق