मख़दूम समाचार
मुंबई (प्रतिनिधी) २७.१०.२०२३
सन २०२४ मध्ये होणाऱ्या १० वीच्या म्हणजेच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यासाठी सर्व माध्यमिक शाळाप्रमुखांनी विद्यार्थ्यांचे अर्ज नियमित शुल्कासह सरल डाटाबेसवरून सोमवार ता. २० नोव्हेंबर २०२३ पर्यंत भरण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी केले आहे.
إرسال تعليق