अनाथांची दिवाळी माणुसकीच्या नात्याने गोड झाली - ह.भ.प. कृष्णानंद महाराज

श्रीरामपूर प्रतिनिधी:
सण,उत्सव, उपक्रम हे मानवी संस्कृतीचे आनंदपर्व असते. विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान, वाचन संस्कृती प्रतिष्ठान आणि सेवाभावी स्नेही मान्यवरांच्या दिवाळी फराळ, किराणा माल,देणगी इत्यादी माध्यमातून आमच्या अनाथ आश्रमाची दिवाळी गोड झाली असल्याचे आनंद उदगार ह. भ. प. कृष्णानंद महाराज यांनी व्यक्त केले. 
श्रीरामपूर जवळील गोखलेवाडी येथील श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमात विविध व्यक्ती, संस्था यांच्यातर्फे देण्यात आलेल्या मदतीबद्दल कृष्णानंद महाराज बोलत होते.रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आणि वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी कृष्णानंद महाराज म्हणजे आजच्या काळातील गोरगरीब, दुर्लक्षित,अनाथ गोपाळरूपी सवंगड्याचे कृष्णरूप आहे.त्या कृष्णाकडे सत्ता, वैभव होते, पण आजच्या कृष्णानंद महाराजांकडे फक्त सेवाधर्म आहे.आकाश फाटलेले तर माळावरचे दुर्ललक्षित जगणे जगविणे हाती आहे. त्यांनी जो देईल तो भगवंत ह्या भूमिकेतून पाहिल्यामुळे त्यांना हजारो हात लाभले आहेत,असे सांगून ही गोपालनगरी ज्ञानाची आणि माणुसकीची कार्यशाळा असल्याचे सांगितले. या उपक्रमात विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे सुखदेव सुकळे यांनी  फराळ दिला. वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी किराणा सामान दिले, प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी केळी आणि इतर मदत केली.अरुण व्यवहारे आणि बेलापूरच्या शिक्षिका कवयित्री सौ.अनिता व्यवहारे यांनी दोन हजार रुपये आणि इतर देणगी दिली. सुरेश ताके, सौ. अंजली ताके, कु. प्रज्ञा ताके यांनीही मदत दिली. त्याप्रसंगी बोलताना कृष्णानंद महाराज पुढे म्हणाले की,डॉ. बाबुराव उपाध्ये, सुखदेव सुकळे, पत्रकार राजेंद्र देसाई इत्यादी साहित्यिकांमुळे आम्हाला विविध मदतीचे हात लाभले आहेत.ही माणुसकीच्या सेवेची साखळी आहे, त्यातूनच आमच्या दुर्लक्षित आश्रमाला सतत गरजेपुरते देणे लाभत आहे. माणसात देव पाहण्याची संस्कृती अशा माणसात दिसते, असे सांगून कृष्णानंद महाराज यांनी प्रा. शिवाजीराव बारगळ, सौ.अनिता अनिल व्यवहारे आदिंचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केले. यावेळी प्रा.बारगळ म्हणाले, कृष्णानंद महाराज यांनी आपल्या वीस वर्ष वय असलेल्या अवस्थेतच सेवेचा आदर्श निर्माण केला आहे, ही सेवेची पंढरी आणि अनाथांची शिर्डी आहे.येथे विठ्ठल रुक्मिणी, श्री साईबाबा  मंदिर फार सुंदर आहे.हे स्थळ म्हणजे पुण्यशील असल्याचे सांगून आपण प्रथमच आल्याचा आनंद व्यक्त केला.सुयोग बुरकुले यांनी नियोजन केले तर दिवाळीचा आनंद अनाथासमवेत साजरा करीत सुखदेव सुकळे यांनी आभार मानले.
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा