आंतरराष्ट्रीय संगीत परिक्षेत ग्रेस म्युझिक अ‍ॅकॅडमीचे घवघवीत यश; माऊली संकुलात वार्षिक म्युझिकल उत्सवाचे आयोजन


    लंडन (प्रतिनिधी) २८.११.२०२३

     येथील ट्रिनिटी कॉलेजच्यावतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत अहमदनगरमधील ग्रेस म्युझिक अ‍ॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. यात ईशा बडवे, अशिता लोखंडे, अ‍ॅरन पंडित यांनी इलेक्ट्रॉनिक किबोर्ड  ग्रेड-१ तसेच भार्गवी ढोके, शर्लिन सोनावणे, ओजस राऊत यांनी इलेक्ट्रॉनिक कि-बोर्ड इनिशियल ग्रेड व ओंकार राऊत याने प्लॅक्ट्रम गिटार इनिशियल ग्रेड परिक्षेत गुणवत्तापुर्वक यश संपादन केले.

     ग्रेस फौंडेशनच्या ग्रीस म्युझिक अ‍ॅकॅडमीच्या वार्षिक उत्सवानिमित्त शनिवारी ता. २ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४:३० वाजता माऊली संकुल, झोपडी कॅन्टीन, सावेडी, अहमदनगर येथे वार्षिक म्युझिकल उत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ग्रेस म्युझिक अ‍ॅकॅडमीचे डायरेक्टर पिटर पंडित यांनी सांगितले. म्युझिकल उत्सवास प्रमुख पाहुणे म्हणून फादर ऑलविन मिस्किटा (एसडीबी), पवन नाईक (आंतरराष्ट्रीय सुफी गायक), धनेश बोगावत (संगीततज्ञ) व सुहास मुळे (संगीत समिक्षक) आदि उपस्थित राहणार आहेत.

      कार्यक्रमात ग्रेस म्युझिक अ‍ॅकॅडमीचे विद्यार्थी नवीन-जुने हिंदी-मराठी-इंग्रजी गीते सादर करतील. सर्वांना प्रवेश विनामुल्य असून संगीत उत्सवास रसिकांनी उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन सोनाली पिटर पंडित यांनी केले आहे.




Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा