अहमदनगर - अलकरम हॉस्पिटल व बुधराणी हॉस्पीटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व लेंन्स वर्ल्ड ऑप्टिकल इमरान शाह चष्मा वाला च्या सहकार्याने गुरुवार दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता अल-करम हाॅस्पिटल इंगळे मेडिकल मागे किंग्जगेटरोड रामचंद्रखुंट शहादवाल दर्गा समोर अहमदनगर येथे भव्य मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिराचे तसेच चष्मे अल्पदर 50% डिस्काउंट मध्ये देण्यात येणार असल्याची माहिती संयोजक तौफिक तांबोली यांनी दिली.
तपासणीसाठी नांव नोंदणी आवश्यक आहे. येताना रुग्णांनी रेशन कार्ड, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र यापैकी एकाची झेरॉक्सप्रत दोन पासपोर्ट फोटो, घेऊन येणे. शस्त्रक्रिया करण्याचे तपासणी नंतर ठरल्यास रुग्णांना मोफत पुणे येथे नेवुन शस्त्रक्रिया केली जाईल. राहण्याची व खानयाची व्यवस्था ही मोफत केली जाईल. तरी या संधीचा रुग्नांनी लाभ घ्यावा व नांव नोंदणीसाठी तौफीक तंबोली 9860708016 या नंबर वर संपर्क साधावे असे आवाहन आयोजकां मार्फत करण्यात आले आहे.
إرسال تعليق