अनुभवातून आलेली कविता ही सकस कविता असते : कवी प्रकाश घोडके

शेवगाव – “ माणसाच्या मनातील भाव संवेदना कमीत कमी शब्दात व्यक्त करून त्या सार्वजनिक केल्यास त्याची कविता बनते,आपल्या अनुभवातून आलेली कविता ही सकस कविता असते,अशीच काहीशी धार्मिक प्रवृत्तीची कविता सौ.शीला जावळे यांच्या जिव्हाळा या काव्यसंग्रहात आलेली आहे” असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी,चित्रपट गीतकार प्रकाश घोडके यांनी केले.
        शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने सौ.शीला संजय जावळे यांच्या जिव्हाळा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच पार पडले,यावेळी ते बोलत होते.जेष्ठ पत्रकार,दैनिक लोकमतचे संपादक सुधीर लंके,कवयित्री शर्मिला गोसावी,आशा डांगे, हबीब भंडारे,शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी,अध्यक्ष राजेंद्र उदागे,शाहीर भारत गाडेकर,कवी अर्जुन देशमुख,भगवान राऊत व संजय जावळे यावेळी उपस्थित होते.
      पुढे बोलतांना प्रकाश घोडके म्हणाले कि,जिव्हाळा मध्ये एकून ६९ रचनांचा समवेश असून त्यातील अनेक रचना या जीवनाचा सार सांगणा-या आहेत.यावेळी बोलतांना कवयित्री शर्मिला गोसावी म्हणाल्या कि,“कुटुंबात संस्कार,संस्कृती आणि शिक्षणात मुल्यशिक्षणाचे महत्व असून युवाशक्तीला मूल्य शिक्षणाचे धडे मिळणे आपेक्षित आहे.त्याआनुशंगाने ज्ञान आणि असलेली परिस्थिती याची सांगड घालत संस्कृती जपणारी मने तयार करणे आवश्यक आहे.यासाठी साहित्यिक,कलावंत आपापल्या परीने प्रयत्न करत असून यामध्ये गृहिणीही मागे नाहीत हे सौ.शिला जावळे यांनी आपल्या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.”
      सुधीर लंके,राजेंद्र उदागे,आशा डांगे,डॉ.शंकर चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या.    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती सावंत व स्वाती ठुबे यांनी केले. प्रास्ताविक प्रा.डॉ. अशोक कानडे यांनी केले तर शेवटी राजेंद्र फंड यांनी आभार मानले.यावेळी शब्दगंध च्या शेवगाव शाखेचे अध्यक्ष हरिभाऊ नजन,बाप्पुसाहेब भोसले,प्रा.डॉ.शंकर चव्हाण, वैभव रोडी,ज्ञानेश्वर उंडे,विजय हुसळे, सौ.संगीता दारकुंडे,विद्या भडके,शालन देशमुख,स्वाती राजेभोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा