शिक्षण विभाग जिल्हापरिषद जिल्हाशिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर, अमेझॉन फ्युचर इंजिनिअर, लीडरशीप फॉर इक्विटी आणि कोड टु एनहान्स लर्निंग संस्था,यांच्या संयुक्त सहकार्याने दोन दिवसीय जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सव जिल्हा पातळीवर ४ ते ५ जानेवरी रोजी रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग सभागृह अहमदनगर येथे संपन्न झाला. जिल्ह्यातील जिल्हापरिषद, मनपा शाळामधील मधील ग्रामीण,आदिवासी आणि शहरी ६००० विद्यार्थ्यानी पहिल्या टप्प्यात नोंदणी करून सहभाग घेतला होता. त्यापैकी २३०० विद्यार्थ्यानी अनप्लग (कम्प्युटर शिवाय) चॅलेंज सोडवले होते.तर २३०० विद्यार्थ्यापैकी या अनप्लग चॅलेंज मधील अचूक मांडणी आणि उत्तमपणे कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांची या निकषा आधारे जिल्हास्तरावर १२ शाळांमधील ३६ विद्यार्थ्याची कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सवासाठी निवड करण्यात आली.निवड झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यानी स्क्रॅच प्लॅटफॉर्मवर कोडींग करत त्या समस्यावर उपाय शोधून कोडींगच्या सह्यायाने गेम, अनिमेशन आणि अप्लिकेशन स्वरूपात प्रोजेक्ट तयार केले.
कोडींग प्रोजेक्ट तयार करताना विद्यार्थी एकविसाव्या शतकातील कौशल्ये जसे की चिकित्सक विचार (Critical thinking), सहकार्य (Collaboration), संवाद कौशल्ये (Communication), समस्या निवारण (Problem Solving) यांचा वापर केला. हि कौशल्य नवीन शैक्षणिक धोरण सुचवते की शाळांमध्ये शिकवली गेली पाहिजे,हा प्रोग्राम या धोरणाशी सलग्न ठरत आहेत.या उत्सवात त्यांना आजूबाजूच्या समस्येवर आधारित कोडींग करून प्रोजेक्ट बनवून मान्यवरांसमोर सादर केली. श्रीगोंदा उर्दू शाळेचे यास्मिन खान, अल्फीया शेख, जैनब ताडे आणि वर्गशिक्षिका सौ. असमा मुल्ला यांनी बाल कामगार एक कठीण समस्या या विषयावर प्रोग्राम तयार केलेला होता. उर्दू शाळेच्या या प्रोग्रामला द्वितीय पारितोषिक मिळाले. एकूण सर्व १२ शाळांना ही परोतोषिके देण्यात आली यात पहिल्या पाच शाळांना ४३ इंची LED टीव्ही देण्यात आला तर इतर ७ शाळांना टॅब व रोख बक्षिसे देण्यात आले आणि पहिला क्रमांक आलेल्या शाळेला राज्यस्तरीय हॅकेथॉन उत्सवासाठी निवड करण्यात आली.स्पर्धकांनी केलेल्या विविध सामाजिक विषयावरील प्रोजेक्टच्या मूल्यांकनासाठी परीक्षक म्हणून श्री.रामेश्वर लोटके अधीव्याखाते जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, संगमनेर , दामिनी मेनकर संचालक,लीडरशिप फॉर इक्विटी आणि साईप्रसाद साळे, सहसंचालक लीडरशिप फॉर इक्विटी भूमिका पार पाडली. कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सवाला माननीय श्री भास्कर पाटील (शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर) , स्नेहालय संस्थेचे अध्यक्ष श्री संजय गुगळे श्रीमती. जयश्री कारले, विस्तार अधिकारी, शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर आणि श्री. रामेश्वर लोटके वरिष्ठ अधीव्याखाते जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,संगमनेर,विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत बक्षीसे त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. हा उत्सव इरफान ललानी (संस्थापक, कोड टु एनहान्स लर्निंग, संस्था) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला असून. या उत्सवामध्ये खूप उत्साहाने शिक्षकानी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वतेसाठी तुकाराम लाळगे, राहुल बांगर, रविराज निंबाळकर, पंकज धूर्डे, पूजा जाधव, प्रीती मेश्राम, मीनाक्षी ढंगारे, नानासाहेब पवार, राजेश मुळे आदींनी स्पर्धेचे योग्य नियोजन केले होते. गटशिक्षणाधिकारी श्री. अनिल शिंदे, उप शिक्षणाधिकारी रमजान पठाण, विस्तार अधिकारी नीलकंठ बोरुडे, केंद्रप्रमुख उत्तरेश्वर मोहोळकर, माणिक आढाव, मुख्याध्यापक समिना साचे, आस्माबी मुल्ला, यासिन शेख शाळा सुधार समितीचे अध्यक्ष अख्तर शेख यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
Post a Comment