सुरभि सोशल कनेक्ट अंतर्गत मोफत, सवलतीत उपचार... हजारो रुग्णांनी घेतला लाभ: न्युरो सर्जन डॉ.आगे पूर्णवेळ

अहमदनगर: सुरभि सोशल कनेक्ट अंतर्गत हॉस्पिटलमध्ये मोफत अँजिओग्राफी, हृदयरोग व लिव्हरची मोफत ओपीडी. सवलतीच्या दरात उपचार आदी विविध उपक्रम सामाजिक सेवा म्हणून राबवले जात आहे.याचा आत्तापर्यंत तीन हजार पेक्षा जास्त रुग्णांनी लाभ घेतलेला आहे. तसेच रुग्णसेवेच्या विस्तारा साठी अहमदनगरमध्ये प्रथमच न्यूरो सर्जरीत इंटरव्हेशनल शस्त्रक्रिया करणारे डॉ. भगवान आगे हे पूर्णवेळ सुरभी हॉस्पिटल येथे उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती सुरभि हॉस्पिटलचे चेअरमन व पोटविकार लिव्हर तज्ञ डॉ वैभव अजमेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉक्टर अजमेरे म्हणाले की, सुरभि हॉस्पिटल हे खाजगी तत्त्वावरील हॉस्पिटल असले तरी सीएसआर प्रमाणे विविध उपक्रम सेवाभावी दृष्टिकोनातून राबविले जातात, हॉस्पिटल येथे महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारतसह माजी सैनिक आरोग्य योजनेसह खाजगी कंपन्यांची कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे. सरकारच्या मोफत योजनेत काहीच उपचार आजार बसतात. सर्व आजारांना व उपचार पद्धतीला योजनेचा लाभ मिळत नाही म्हणून सेवाभावी हेतूने गरजू रुग्णांना पैशाअभावी उपचारापासून वंचित राहता येऊ नये यासाठी विविध उपक्रम राबवली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून अँजिओग्राफी विनामूल्य केली जाते. टीएमटी व टूडीईको अत्यंत सवलतीच्या दरात केल्या जातात, तसेच कार्डिओलोजी विभागाची ओपीडी प्रथम येणाऱ्या रुग्णांसाठी मोफत केली जात आहे.
लिव्हर रुग्णांसाठी दर शुक्रवारी मोफत ओपीडी सेवा आहे. तसेच हृदयरोग, लिव्हर मोफत ओपीडीचा लाभ घेणाऱ्या रुग्णांच्या विविध रक्त व पॅथॉलॉजिकल तपासण्या ह्या 50 टक्के सवलतीच्या दरात केल्या जातात. सुरभि सोशल कनेक्ट नुसार वेगवेगळे कॅम्प जिल्ह्यात राबवलेले आहेत. श्रीरामपूर, शेवगाव पाथर्डी या ठिकाणी मोफत कॅम्प झाले आहेत, मोफत कॅम्पमधील रुग्णांच्या तपासणी हॉस्पिटलमध्ये 50% सवलतीत व विविध शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात केल्या जातात. मोफत उपचारचा तीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी फायदा घेतलेला आहे. मागील पाच महिन्यात सवलतीच्या टूडीइकोचा लाभ दीड हजार रुग्णांनी घेतलेला आहे. 200 टीएमटी झाल्या आहेत.
लिव्हरच्या मोफत ओपीडीचा शेकडो रुग्णांनी फायदा घेतला आहे. डायग्नोपिंग या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात सगळ्यात स्वस्त सिटी व एमआरआय सुरभि हॉस्पिटल येथे केले जातात. फक्त 1900 मध्ये एमआरआय व 900 रुपयात सीटी स्कॅन केले जाते. हे दर धर्मादाय रुग्णालयांपेक्षाही अत्यंत कमी आहेत. हॉस्पिटलमध्ये ट्रॉमा विभाग अधिक सक्षम करण्यासाठी अतिदक्षता विभाग प्रमुख प्रियन जुनागडे, अस्थिरोग तज्ञ डॉक्टर विलास व्यवहारे यांच्या सोबतीला आता न्यूरोसर्जन डॉ. भगवान आगे हे पूर्णवेळ उपलब्ध झाले आहेत. अर्धांगवायू आल्यानंतर 24 तासांचे आत योग्य उपचार करून रुग्ण पूर्णपणे बरा करता येऊ शकतो. त्यात डॉक्टर आगे यांचा विशेष हातखंडा आहे. त्यामुळे नगरमधील अर्धांगवायू रुग्णांना त्याचा लाभ घेता येणार आहे. अर्धांग वायूनंतर रुग्ण नातेवाईकांनी 9637372424 या मोबाईल क्रमांकावर संपर्क केल्यानंतर तात्काळ सेवा उपलब्ध करून दिली जाईल. डॉ. आगे यांनी मुंबई येथील केएम येथून एमबीबीएस पदवी घेतल्यानंतर चेन्नई येथून न्यूरो सर्जरी बेंगलोर येथून स्पाईन सर्जरीची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. 
सुरभि सोशल कनेक्ट या उपक्रमासाठी पोटविकार व लिव्हरतज्ञ डॉक्टर वैभव अजमेरे, हृदयरोग तज्ञ डॉक्टर अमित भराडिया, कॅन्सर तज्ञ डॉक्टर तुषार मुळे, अतिदक्षता तथा मधुमेह तज्ञ डॉ. प्रियन जुनागडे, अस्थिरोग तज्ञ डॉक्टर विलास व्यवहारे, लेप्रोस्कोपिक व जनरल सर्जन डॉक्टर श्रीतेज जेजुरकर, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सुलभा पवार, भूलतज्ञ डॉक्टर भूषण लोहकरे, रेडिओलॉजिस्ट डॉक्टर ऋचा पितळे, डॉ. कोमल अजमेरे आदींसह विविध व्हिजिटिंग तज्ञ डॉक्टरांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा