महाराष्ट्रातील पहिलावहिला ईद विशेषांक : नब्ज़


ग्रंथपरिचय 
१२.३.२४

     'नब्ज़' हा महाराष्ट्रातील पहिला - वहिला ईद विशेषांक. महाराष्ट्रातील दिवाळी अंकांच्या परंपरेच्या धर्तीवर ईद विशेषांक प्रकाशित करावा या कल्पनेतून २०२१ सालापासून 'नब्ज़'चे प्रकाशन सुरू करण्यात आले.
    'नब्ज़'ची निर्मिती करण्यामागे नेमका विचार आहे. आपला सभोवताल धर्म, द्वेष आणि हिंसा यांनी गढूळला आहे. माणसाकडे 'माणूस' म्हणून पाहणेदेखील लोकांना शक्य होत नाही, हे पावलोपावली जाणवतेय. प्रत्येक प्रश्न-अडचणी आणि शंका यांची उत्तरे हिंसेंत शोधली जात आहेत, उत्तरं देण्याची भाषा हीन आणि द्वेषाने ओथंबलेली आहे. या साऱ्या स्थितीमागचे कारण म्हणजे, बहुसंख्यांक समाज आणि मुस्लिम समाज यांमध्ये कोणत्याच पद्धतीचा संवाद नाही. हे दोन्ही घटक परस्परांच्या धार्मिक संस्कृती, भाषा, खानपान, वेशभूषा इत्यादी घटकांच्या सान्निध्यात राहात असूनही परस्परांबद्दल अनभिज्ञ आहेत. या विसंवादामुळे शंका आणि अविश्वास फोफावला आहे. 'नब्ज़'ला या दोन्ही घटकांमध्ये संवादाची बीजं रुजवण्याची गरज भासते. मुस्लिम संस्कृतीची, त्यांच्या विश्वास-श्रद्धा-विचारांची, धर्माची-मूल्यांची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दाढी-टोपीपलिकडे पाहिल्या जात नसलेल्या मुस्लिम माणसाची, त्यातील चांगुलपणाची ओळख करुन देण्याचा प्रयत्न 'नब्ज़' विशेषांक करु पाहते.
    यंदा 'नब्ज़'चा तिसरा अंक प्रकाशित होत आहे. 'नब्ज़' ज्या विचाराने काम करु पाहतेय, तो विचार-ते प्रयत्न लोकांपर्यंत व्यवस्थित पोचत असावेत, कारण केवळ दोनच अंकात 'नब्ज़'ला जाणकार वाचक, पत्रकार, लेखक, सामाजिक कार्यकर्ते यांचे प्रेम लाभत आहे.
    'नब्ज़'च्या निर्मितीमागे कोणतीही संस्था उभी नाही. या विशेषांकाला अद्याप पैशांचे भक्कम पाठबळ लाभलेले नाही. अंकांच्या विक्रीतून किमान निर्मिती खर्च गोळा होईल, असा पल्ला अद्याप गाठायचा आहे. मात्र हा विचार पोचणं, मुस्लिम समाजाची बहुसंख्यांक समाजाला सच्ची ओळख होणे सध्याच्या काळात फार गरजेचं आहे. त्यामुळेच; तुम्ही 'नब्ज़'च्या पाठीशी आर्थिक आधारस्तंभ म्हणून उभं राहावे अशी विनंती करत आहे. तुमची मदत लहान असो वा मोठी, ती स्वागतार्ह आहे.
    आम्ही समाजातील दुराव्याच्या, द्वेषाच्या, गैरसमजूतीच्या भिंती पाडण्याचा प्रयत्न करतोय. या प्रयत्नांमध्ये तुमचाही सहभाग असावा.
 - टीम 'नब्ज़'

तुम्ही ही आर्थिक मदत पुढील जीपे क्रमांकावर किंवा बँक डिटेल्सद्वारे खात्यावर पाठवू शकाल.
 Google Pay number - 9960503623


Bank Details - Acacia Media and Research Center LLP

 Account Number -
 003905029172

 IFSC Code - ICIC0000039
 PAN Card No - ACBFA4843L

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा