अहमदनगर (आबीद खान )- रमजान निमित्त गृह उद्योग, महिला बचत गट व लघु उद्योग व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मुकुंदनगर येथे अपना बजार शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. मुकुंदनगर येथील सीआयव्ही सोसायटीच्या मैदानावर 30 मार्च पासून हा बजार भरणार असल्याची माहिती अकिस सय्यद यांनी दिली.
अपना बजार शॉपिंग फेस्टिवलचे हे तिसरे वर्ष असून, यामध्ये रमजान ईदसाठी लागणारे साहित्य, कपडे, सौंदर्यप्रसाधने व दैनंदिन वापरातील विविध वस्तूंच्या स्टॉलचा समावेश राहणार आहे. तसेच खाण्या पिण्याच्या स्टॉलसह लहान मुलांसाठी विविध खेळण्यांचा देखील समावेश आहे. या बजारच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार आहे. या बाजारात स्टॉल लावण्यासाठी विविध व्यावसायिक व लघु उद्योजकांना आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9518795077 व 8856091873 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.
إرسال تعليق