बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वॉरियर्स चे प्रयत्न : देवयानी दिघे

अहमदनगर - बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वॉरियर्स फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणारे प्रयत्न अतिशय स्तुत्य असून बालकांचे भविष्य घडण्यासाठी वॉरियर्स फाउंडेशन चे उपक्रम उपयुक्त आहेत. संस्कारक्षम वयातच भारतीय संस्कृतीचे संस्कार होणे महत्त्वाचे आहे* असे मत एम.बी. प्लेसमेंट च्या संचालिका, सामाजिक कार्यकर्त्या देवयानी दिघे यांनी व्यक्त केले.
वॉरियर्स फाउंडेशन संचलित प्री प्रायमरी स्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात त्या कॉटेज कॉर्नर येथे प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वॉरियर्स फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला गोसावी या होत्या.
     पुढे बोलताना देवयानी दिघे म्हणाल्या की, बाल वयात होणारे संस्कार अतिशय महत्त्वपूर्ण असून मुलांचे भविष्य उज्वल होण्यासाठी हेच संस्कार पुढे उपयुक्त ठरत असतात. पालकांनी आपल्या बालकांना जवळच्याच नर्सरी स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यास बालकांना अधिक वेळ देता येईल. या परिसरातील बालकांची सोय वॉरियर्सच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या प्री प्रायमरी स्कूल मुळे होत असून येथे बालकांचे भविष्यही उज्वल होत आहे. विविध सण,उत्सव व राष्ट्रीय नेत्यांच्या जयंती,पुण्यतिथी साजरी करून बालकांना संस्कृतीची ओळख करून देण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
स्मृति घोडेस्वार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी परिसरातील अनेक मान्यवर व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  संगीता गोसावी, स्मृती घोडेस्वार, वर्षा गुजर यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा