वॉरियर मध्ये आंबेडकर जयंती साजरी

अहमदनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक परिवर्तनामध्ये सर्वश्रेष्ठ  योगदान असुन त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी अविरतपणे ग्रंथ वाचन करायला हवे असे प्रतिपादन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी व्यक्त केले.
   वॉरियर्स फाउंडेशन च्या वतीने आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारंभात ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले कि,गरीब श्रीमंत दरी कमी होणे गरजेचे आहे.वाचनाने माणूस सुसंस्कृत बनतो आणि आपल्या ज्ञानाच्या कक्षा वृंदावल्या जातात. वाचन लेखनाने माणूस समृद्ध बनतो हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे, याचा आदर्श नव्या पिढीने घ्यायला हवा. 
यावेळी वॉरियर्स फाउंडेशनच्या अध्यक्ष शर्मिला गोसावी, संगिता गिरी, स्मृती घोडेस्वार, वर्षा गुजर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुष्पहार अर्पण करून उपस्थित नागरिक, पालक, विद्यार्थ्यांना  पुस्तकांचे  वाटप करण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा