मातेच्या अस्थींचे विसर्जन ....... वृक्षारोपण करून नविन पायंडा

संगमनेर - 'संगमनेर तालुक्यातील खळी  गावात रेवुबाई सखाराम वाघमारे यांचे वृधापकाळाने नुकतेच निधन झाले.बौद्ध धर्माच्या नियमानुसार अग्नि संस्कारानंतर अस्थींचे विसर्जन तीर्थक्षेत्री नदीत न करता आईच्या नावाने राहत्या घरासमोर एक आंब्याचे झाड लावुन त्याच्या बुंध्यास अस्थींचे विसर्जन करण्याचा निर्णय त्यांच्या सहा मुलांनी व नातलगांनी एकमताने घेतला. या कृतिमूळे पाण्याचे प्रदुषण टाळून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी एक नवीन पायंडा पाडून समाजास नविन दिशा देण्याचे कार्य घडले आहे,' असे प्रतिपादन बौधाचार्य अशोक गायकवाड यांनी पुण्यानूमोदन कार्यक्रमात केले. 
यावेळी शब्दगंध साहित्यिक  परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी, आसान अपंग संस्थेचे अध्यक्ष संजय साळवे, तेरेजा भिंगारदिवे, कासा संस्थेचे सुनिल गायकवाड, बाळासहेब साळवे, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ एन जी ओ (मँगो) चे सचिव प्रसाद भडके इ मान्यवर उपस्थित होते. 
 मातोश्रींच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला
              कार्यक्रम यशवितेसाठी पांडूरंग वाघमारे, शिवाजी कदम, तान्हाजी कदम, रावसाहेब वाघमारे, उल्हास वाघमारे, सुधाकर वाघमारे, नंदू वाघमारे, डॉ. रमेश वाघमारे, सुरेश वाघमारे, आर. पी. आय उत्तर महाराष्ट्र सचिव किशोर वाघमारे  व खळी गावचे ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.
यावेळी परिसरातील मान्यवरांसह लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा