गौरवनगर फकीरवाडा येथील ड्रेनेज लाईन दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी नागरिकांची मनपा आयुक्तांकडे धाव.

अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन.
गौरवनगर फकीरवाडा येथील ड्रेनेज लाईन दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी नागरिकांची मनपा आयुक्तांकडे धाव.
ड्रेनेजचे मैलमिश्रित पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचा आरोप  
अहमदनगर (प्रतिनिधी)- वार्ड क्रमांक ४ मधील गौरवनगर फकीरवाडा येथील मोठी ड्रेनेज लाईन गेलेली आहे. ती ड्रेनेज लाईन वारंवार तुंबत आहे व तुंबल्या नंतर त्यातील मैलमिश्रित पाणी सर्व रस्त्यावरून नागरिकांच्या दारातून वाहत आहेत या वार्डच्या विभागीय कार्यालयात वारंवार तक्रारी केल्या आहे. परंतु तक्रार केल्यानंतर सफाई कामगार तात्पुरती पट्टी टाकून पाण्याला वाट करून देतात आणि परत पुढील ६ ते ७ दिवसात पुन्हा ड्रेनेज लाईन पॅक होते. पुन्हा मैलमिश्रित पाणी नागरिकांच्या दारातून वाहते त्यामुळे येथे समपूर्ण दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून घरातील लहान मुले वृद्ध सतत आजारी पडत असल्याने अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने गौरवनगर फकीरवाडा येथील ड्रेनेज लाईनचे काम त्वरित चालू करण्याच्या मागणीसाठी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांना निवेदन देताना छावा संघटनेच्या महिला जिल्हाअध्यक्ष सुरेखाताई सांगळे समवेत गिरीश मुळे, पूनम शेलार, नागनाथ कासार, सोनाली शेलार, सना शेख, राम चिंचोळी, नईम सय्यद, संगीता केरूळकर, सोनाली मुनोत, प्रदीप कारर्ड, मझहर अली, सुनिता साळी, रिजवान पठाण, शोभा घाडगे, पुष्पा शिंदे आदीसह प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा