कु.डॉ.बेनज़ीर अब्दुल सत्तार शेख यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

नेवासा तालुक्यातील सलाबतपूर गावातील कवयित्री तथा विसावा फाऊंडेशन सलाबतपूर या संस्थेची खजिनदार कु. डॉ.बेनजी़र अब्दुल सत्तार शेख यांना २०२४ या वर्षीचा समाज भुषण पुरस्कार गोकुळ बाल संस्कार सामाजिक संस्था जिल्हा ठाणे यांच्या वतीने ज्येष्ठ गझलकार रज्जाक दादा शेख यांच्या शुभहस्ते नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड या ठिकाणी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत आदरणीय कॉम्रेड बाबा आरगडे हे होते.यावेळी झालेल्या कार्यक्रमामधे व्यासपीठावर प्रमुख मान्यवर प्रसिद्ध चित्रकार भारतकुमार उदावंत, कवयित्री कल्पना निंबोकर , गोकुळ बाल संस्कार संस्थेचे अध्यक्ष श्री संतोष साखरे सर,दैनिक साहित्य सेवाचे संपादक नितीन गायके सर आदि मान्यवर उपस्थित होते.
कवयित्री डॉ.बेनजी़र अब्दुल सत्तार शेख या अनेक वर्षांपासून कविता, छंदोबद्ध कविता वृत्तबद्ध कविता, गझल,लावणी,बालकविता तसेच लेख लेखन,कथा लेखन असे लिखाण करतात.त्यांचे आतापर्यंत १२ प्रातिनिधिक काव्य संग्रह प्रकाशित झालेले आहेत.तसेच काव्य स्पर्धेमधे प्रथम, व्दितीय, तृतीय, उत्कृष्ट जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय अश्या अनेक पुरस्कारांनी विविध संस्थेने सन्मानित केलेले आहे.
परंतु, त्यांना हा पुरस्कार कवितेसाठी मिळालेला नसून त्यांनी केलेल्या भटक्या,मुक्या प्राण्यांच्या सेवेसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या गेल्या एका दशकापासून भटकी जनावरे जसे विशेष करून कुत्रे मांजर यांची अविरत सेवा करतात. त्या या सर्व जनावरांचे आपल्या लेकराप्रमाणे संगोपन करतात, त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा