मनोज जरांगे पाटील यांचे शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागत... मुस्लिम समाज बांधवांनी केला शिवाजी महाराजांचा एकच जयघोष

मनोज जरांगे पाटील यांचे शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागत
मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीस पाणी वाटप
मराठा व मुस्लिम समाज बांधवांनी केला शिवाजी महाराजांचा एकच जयघोष
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातून सोमवारी (दि.12 ऑगस्ट) निघालेल्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे माणिक चौक येथे मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागत करुन, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
तर रॅलीत सहभागी झालेल्या मराठा बांधवांना मुस्लिम समाजाच्या वतीने पाणीच्या बॉटलचे वाटप करण्यात आले. यावेळी हाजी मन्सूर शेख, तब्लीक जमातचे प्रमुख अब्दुस सलाम, सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद (भा) कुरेशी, नगरसेवक समद खान, उबेद शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद, खालिद शेख, विश्‍व मानवाधिकार परिषदचे प्रदेशाध्यक्ष नवेद शेख, सुफियान शेख, आरिफ पटेल, सरफराज कुरेशी आदींसह मुस्लिम समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मराठा व मुस्लिम समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच जयघोष करुन एक मराठा लाख मराठा! च्या घोषणा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा