श्रीरामपुर / प्रतिनीधी: श्रीरामपूर तालुक्यातील सर्व आजी-माजी सैनिकांना कळविण्यात येते की, तहसील कार्यालय श्रीरामपूर येथील प्रशासकीय इमारत याठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महसूल पंधरवड्याचे नियोजन प्रतिवर्ष केले जाते, त्या प्रमाणे यावर्षीही केलेले असुन सैनिक हो तुमच्या साठी हा शनिवार दिनांक १० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे,त्यासाठी ज्या सैनिकांचे, शेतजमीन वाटप,नोंदी,फेरनोंदी, रेशनकार्ड नवीन बनवने,नाव समाविष्ट व कमी करणे, जातीचा दाखला, डोमेसाईल, रहिवाशी दाखला, एक वर्ष व तीन वर्ष उत्पन्न दाखला, शेती असल्याचा व नसल्याचा दाखला, कुणबी प्रमाणपत्र, अल्पभूधारक दाखला, सेंट्रल व स्टेट नॉन क्रिमिलियर, इ डब्ल्यू एस ,भूमिहीन, बांधाच्या तक्रारी, शेतीचे अंतर्गत रस्ते, शासनाकडून मिळालेल्या जमीनीवर अतिक्रमण, शासनाचे वाटप पत्र,त्यासाठी लागणारे सर्व कागदपत्र ७/१२, ८ अ, फेरफार व तक्रार अधिक माहितीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती चार्ट सोबत पाठवला आहे, अर्ज दोन दोन प्रती मध्ये शनिवार दिनांक १० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता सोबत घेऊन सदरील ठिकाणी हजर राहावे अशी माहिती मेजर कृष्णा सरदार व मेजर संग्रामजीत यादव यांनी संघटनेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
वृत्त विशेष सहयोग, पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव, संकलन - समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर - ९५६११७४१११
Post a Comment