ईद ए मिलाद उन नबी, राहाता शहरात मोठ्या उत्साहात साजरी

अजीजभाई शेख / राहाता 
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही  राहाता शहरात प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर जयंती (ईद ए मिलाद उन नबी) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातून भव्य झेंडा रॅली (जुलूस) मिरवणूक काढत मुस्लिम बांधवाच्यावतीने प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त मिठाई, चॉकलेट, बिस्कीट आदींचे वाटप  करण्यात आले. येथील सय्यद बाबा दर्गाह येथून कुरान पठन करुन मिरवणूकीस प्रारंभ करण्यात आला होता,सदर मिरवणूक छत्रपती संभाजी चौक, चितळीरोड जिल्हा परिषद मराठी शाळा समोरुन छत्रपती शिवाजी महाराज चौक, तय्यबा मस्जि़द, कोपरगांव नाका, शनी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते ह.सय्यदबाबा दर्गाह याठिकाणी मिरवणुकीची सांगता झाली. 
या प्रसंगी उपस्थित नागरिकांना इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबरांची दिलेल्या शिकवणीबाबत जावेद अत्तारी यांनी प्रवचन करत प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी जगाला दिलेला मानवतेचा संदेश याविषयी आपल्या प्रवचनाद्वारे सांगितले की, हजरत मोहम्मद पैगंबरांच्या शिकवणी प्रमाणे मानवाने कधीच उच - निच गरीब- श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांशी प्रेमाने वागावे, तो कोणताही जाती-धर्माचा किंवा पंथाचा असो त्याच्याशी सौजन्याने वागावे, आपल्या शेजारच्यांची नेहमी मदत करावी, होईल तितके ज्ञान प्राप्त करावे,जास्तीत जास्त शिक्षण घ्यावे, स्त्रियांना मुलभूत हक्क अधिकारांसोबत सन्मानाची वागणूक द्यावी. वडीलधारें तथा आपल्या माता - पितांचा आदर सन्मान करावा, त्यांना केवळ आपण मोबदला देऊन मुक्त झालो असे कधीच समजू नये, त्यांनी जसा आपला सांभाळ, संगोपन केले आहे तसेच आपणही त्यांचा सांभाळ, संगोपन करावा. असेही त्यांनी स्पष्ट केले.
तदनंतर नियाज (मिठाई प्रसाद)  वाटप करण्यात आले. 
यावेळी पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे साहेब , सामाजिक कार्यकर्ते हाजी मुन्नाभाई शाह, पप्पू भाऊ बनसोडे , धनंजय निकाळे, ज्येष्ठ पत्रकार शाह मुश्ताकअली, पत्रकार संदीप वाव्हळ ,पत्रकार किरण वाबळे, पत्रकार चोखर, ईलियासभाई शाह, ऍड.अजीम शेख, इफ्तेकार शेख, नाजीम शेख, तौफीक शेख, सामाजिक कार्यकर्ते तथा आर.टी.ओ. कन्सल्टंट रियाजभाई शेख, अहेमदभाई रेडिएटरवाले, अजीजभाई शेख, मौलाना हाफिज अकीब रज़ा,मौलाना अकबर साहब ,मौलाना शाहरुख मिसबाही,मौलाना अहमद कादरी, अय्याज बैग, जावेद अत्त्तारी,डॉक्टर नजीर शेख, मुसा बेग, अकील बेग, इशराक भाई बेग,अश्फाक बेग,अनवर शेख, राजा भाऊ पाळंदे, अख्तर शेख,शरीफभाई शेख व शहरवासी उपस्थित होते. प्रवचनानंतर शाल व पुष्पगुच्छ देऊन राहाता पोलिस कार्यालयाचे पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे व इतर मान्यवरांचा सत्कार  करण्यात आला.आयोजक अध्यक्ष. मुसा बेग यांनी उपस्थितांचे आभार मानले.
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा