महागाईच्या काळात मोफत शिबिरांची अत्यंत आवश्यकता- महबूब शेख
नगर- तंत्रज्ञानाच्या युगात वावरताना आज प्रत्येक बाबी हे महागड्या होत आहे. त्याचप्रमाणे आजारांचे उपचार ही दिवसां दिवस महाग होत आहे. त्यासाठी मध्यमवर्गीयांसाठी मोफत शिबिरांची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन यूनिवर्सल एज्युकेशन ट्रस्टचे व्हाईस चेअरमन महबूब शेख यांनी केले.
गणेश उत्सवानिमित्त युनिवर्सल एज्युकेशन ट्रस्टच्या डेंटल केअर अँड इन्पांट सेंटरच्या वतीने संजय नगर येथील स्नेहालय बालभवन येथे मोफत दंत तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी ट्रस्टचे व्हाईस चेअरमन मेहबूब शेख, डॉ सावंत पालवे, डॉ सायली शिंदे, मास्टर मुश्ताक, दीपा शिंदे, अंबादास पोटे, ऋतिक लोखंडे, दिपाली, अंजली, चंद्रकला व रेखाताई आदी उपस्थित होते. शिबिरात मोठ्या प्रमाणात मूलं व लोकांनी दातांची तपासणी करून मार्गदर्शन घेतले. पुढे बोलताना महबूब शेख म्हणाले की सध्याच्या काळात सण उत्सव साजरे करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना सर्वांनी ते साजरे करताना आपली जबाबदारी समजून सर्व रोगांसाठी शिबिर आयोजित केले पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा शिंदे यांनी केले तर आभार मास्टर मुस्ताक यांनी मांनले.
Post a Comment