अहमदनगर - प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त इन्सानियत फाउंडेशन, अज़लान- ए- रज़ा सोशल फाउंडेशन व बुथ हॉस्पिटल च्या वतीने म.न.पा आरोग्य केंद्र मुकुंदनगर येथे मोफत सर्वरोग निदान व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. याचा भरपूर रुग्णांनी लाभ घेतला. या प्रसंगी बूथ हॉस्पिटल चे तज्ञ डॉक्टर्स व त्यांचे स्टाफ यांनी चांगल्या पद्धतीने रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार केले. यावेळी इन्सानियत फाउंडेशनचे अध्यक्ष मतीन पठाण, उपाध्यक्ष जमीर शेख, खजिनदार फरदिन खान, सचिव बशीर शेख, अफरोज शेख, शाहरुख खान, जाकीर शेख, वसीम तांबोळी, सलमान शेख, शोएब बॉक्सर, तबरेज शेख, मुनाफ सय्यद, जब्बार शेख, तौफिक शेख, मोईन देशमुख पत्रकार, फारुख शेख, पत्रकार नासिर सय्यद, मेडिकल प्रतिनिधी फिरोज सय्यद, कास्ट ट्राईब संघटनेचे अध्यक्ष आरिफ शेख, एडवोकेट फिरोज सय्यद आदी उपस्थित होते. तसेच मध्यरात्री अहमदनगर येथील रस्त्यावर झोपणा-या गोरगरिबांना फाउंडेशनच्या वतीने ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.
إرسال تعليق