संगमनेर-- मुस्लिम, ख्रिश्चन, मराठा, धनगर तसेच वंचित दुर्बल घटकांना आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात मध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करून समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने पदाधिकाऱ्यांनी पुणे ते दिल्ली दरम्यानच्या सामाजिक न्याय पदयात्रेच्या उपक्रमाची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची कारखाना कार्यस्थळावर भेट घेऊन माहिती दिली तर आ. बाळासाहेब थोरात यांनी पदयात्रेच्या उपक्रमाचे कौतुक केले
सामाजिक न्याय पद यात्रेचे प्रमुख असलम बागवान म्हणाले की, अनेक वर्षापासून आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे राजकीय हेतू ठेवूनच आजपर्यंत समाजाचा उपयोग करून घेतला जात आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, बिहार, महाराष्ट्र या राज्यांमध्ये इंदिरा सहानी यांच्या 1992 च्या अहवालानुसार आरक्षण मर्यादा वाढविली आहे संसदेमध्ये सामाजिक न्यायानुसार देशांमध्ये आरक्षण क्षमता वाढविणे गरजेचे असून यासाठी प्रसार व प्रचार करून शासनाचे लक्ष वेधले जावे त्या दृष्टीने सामाजिक न्याय पद यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ही बागवान यांनी निवेदनाद्वारे दिली आ. थोरात यांनी महाविकास आघाडी सर्व समाज घटकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून न्याय देण्या साठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले यावेळी पदयात्रेचे संगमनेर शहरांमध्ये ठिकठिकाणी वतीने स्वागत करण्यात आले पदयात्रेत असलम बागवान, सादिक भाई मजाहिटी, नाजीमा शेख,हालीना शेख, फातिमा शेख आदींसह एकता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष असिफ शेख, महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले, अफसर तांबोळी, सादिक तांबोळी, शोहेब सय्यद, प्रा. बाबा खरात, बाळासाहेब गायकवाड, अँड. प्रसाद सांगळे, लाजारस केदारी, सिमोन रूप टक्के, श्रीधर भोसले, प्रभाकर चांदेकर, जाकीर पेंटर,फ्रान्सिस भोसले आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संविधान बचाओ देश बचाओ च्या नाऱ्याने परिसर दुमदुमून गेला
Post a Comment