गेली बेचाळीस-त्रेचाळीस वर्षापासूनचा जटिल बनलेल्या जिल्हा विभाजन प्रश्न अंतिम टप्पात आला आहे. सर्वांगीण विकासासाठी जिल्हा विभाजन हाच एकमेव लोकाभिमुख पर्याय ठरणार आहे. योगायोगाने जिल्हा विभाजनाला आचारसंहिता लागण्यापुर्वी विजयादशमीचा मुहूर्त अपेक्षित आहे. शासनाने निकषाच्या आधारे श्रीरामपूर जिल्हा घोषित करण्यासाठी चिंतन मेळाव्यात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच अंध विद्यार्थी आर्तहाक देणार आहे. विश्रामगृह येथे शनिवारी दु. ४:०० वा. होणाऱ्या चिंतन मेळाव्यास सर्वपक्षीय सर्व पदाधिकारी कार्यकर्ते विविध सामाजिक संघटना विविध मंडळाचे पदाधिकारी आणि जिल्हा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोक सहभाग नोंदवावा असे आवाहन राजेंद्र लांडगे यांनी केले आहे.
प्रसिद्धी पत्रकात राजेंद्र लांडगे म्हणाले की, श्रीरामपुरातील अंध शाळेतील आजी-माजी विद्यार्थी प्रसिद्ध गायक विकास साळवे यांच्या आवाजातून थेट मुख्यमंत्र्यांना आर्तहाक देणार आहे. या गाण्याचे जिल्हाप्रेमी रोहित मालकर लिखित बोल आहेत- 'श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती तुम्हाला देतीया आर्तहाका`, मुख्यमंत्री साहेब तुम्ही आमची विनंती तेवढी ऐका.. जाहीर आपला जिल्हा, तेव्हढा श्रीरामपूर करून टाका.. असे आहे.
तसेच शासनाने जिल्हा विभाजन प्रश्नी नेमणूक केलेल्या डवले समिती नंतरच्या एकनाथ दांगट समितीवर चर्चा होणार आहे. शिवाय आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीने १५ ऑगस्टला श्रीरामपूर जिल्हा नाही तर मतदान होणार नाही या अल्टिमेटमवर ठाम राहण्यावर देखील चर्चा होणार आहे.
शासन येत्या मंत्रिमंडळ बैठकीत सामाजिक भावनेतून निश्चितच मंजुरी घेऊन निकषाच्या आधारे श्रीरामपूर जिल्हा आचारसंहिता लागण्यापूर्वी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर घोषित करतील अशी संपूर्ण जिल्हा प्रेमींची धारणा आहे.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार अजीजभाई शेख - राहाता
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
Post a Comment