नगर - महाराष्ट्र इंटक ची नवनिर्वाचीत कार्यकारणीची सभा मुंबई येथे संपन्न झाली. यामध्ये सार्वानुमते अरुण विरकर यांची राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) च्या महाराष्ट्र इंटक शाखेच्या राज्यस्तरीय कार्यकारणीच्या सदस्यपदी तसेच महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेस ( इंटक) च्या राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्ति करण्यात आली.व महाराष्ट्र इंटक अध्यक्ष कैलासभाऊ कदम यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेस चे सरचिटणीस दादारावजी डोंगरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम म्हणाले आपण आपल्या कार्यक्षेत्रात संघटीत व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या न्याय हक्कासाठी व संघटना वाढीसाठी प्रयत्न करून संघटना वाढवाल तसेच महाराष्ट्र इंटकचा नावलौकिक वाढवाल असा इंटकच्या सर्व सदस्यांना विश्वास असल्याचे नमूद केले. व अरुण विरकर यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post a Comment