समजातील एकोपा वाढण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम महत्वाचे : अरूण आहेर

समजातील एकोपा वाढण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम महत्वाचे : अरूण आहेर 
*लक्ष्मी कॉलनी मध्ये शब्दगंध काव्ययात्रा*
 
अहमदनगर (प्रतिनिधी) - *समाजातील एकोपा वाढवा यासाठी विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन पूर्वीपासून करण्यात येत असून लक्ष्मी कॉलनीतील नवदुर्गा उत्सव समितीच्या वतीने काव्य संमेलनाचे आयोजन करून प्रबोधनाचे पुढचे पाऊल उचलले आहे*, असे मत ज्येष्ठ शाहीर अरुण आहेर यांनी व्यक्त केले. 
    लक्ष्मी कॉलनी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित नवरात्र नवदुर्गा उत्सवात आयोजित शब्दगंध काव्ययात्रा काव्य संमेलनात ते बोलत होते. कवयित्री शर्मिला गोसावी यांनी सूत्रसंचालन केलेल्या या काव्य संमेलनामध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, जेष्ठ कवी सुभाष सोनवणे, कवी गिताराम नरवडे, मारुती सावंत, कवयित्री स्वाती ठूबे,सुजाता पुरी सहभागी झाले होते. महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभलेल्या या उत्सवांमध्ये स्स्री  जाणिवेच्या कवितांची बरसात कविवर्यानी  यांनी केली तर कवयित्रींनी स्त्रियांच्या विविध प्रश्नांची उकल आपल्या काव्य रचनां मधून केली.यावेळी अहमदनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका दिपाली बारस्कर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी, मंडळाचे दीपक गायकवाड, सत्यप्रेम गिरी, प्रा.डॉ.राजु रिक्कल, विजय वाकळे,पाटील सर,अंजली केदारी, कैलास कांगुणे, ढेमरे, सुरेखा तुपे, मरकड, पानसंबळ मेजर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्वाती ठूबे यांनी 'गर्भातल्या कळीचे मनोगत', गिताराम नरवडे यांनी 'स्त्रियांचे ३६ अलंकार', सुभाष सोनवणे यांनी 'शेतकऱ्याची व्यर्था', सुजाता पुरी यांनी 'प्रेम कविता ', मारूती सावंत यांनी ' शेतकरी बाप ' तर शर्मिला गोसावी यांनी ' जातीय सलोखा' अश्या काव्य रचना सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते आरती करण्यात.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा