शहरातील सेंट झेवियर्स हायस्कूल येथे शाळेचे प्राचार्य फा. विक्रम शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली १४ नोव्हेंबर रोजी बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या दिवशी शाळेकडून विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि त्रिभुवन यांनी तर प्रास्ताविक स्वाती डेरे यांनी केले.
प्रारंभी प्राचार्यांच्या हस्ते
पंडित नेहरू व गुरुनानक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्राथमिक विभागाच्या शिक्षकवृंदानी सादर केलेल्या सुंदर प्रार्थना नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. हायस्कूलच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी बालपणावर आधारीत सुमधुर गीते गायली. दोन्ही विभागातील शिक्षकांच्या वतीने सादर केलेल्या विनोदी नाटिकांमुळे निरागस बालपण हास्यकल्लोळात बुडाले होते.
दरम्यान बालदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना नृत्याचा आनंद घेता यावा म्हणून ध्वनिक्षेपावरून लावलेल्या आवडत्या गीतांवरती विद्यार्थ्यांनी चांगलाच ठेका धरला. रंगीबेरंगी वेश परिधान करून आलेल्या बालगोपाळांनी सामूहिक नृत्याचा मनमुराद आनंद लुटला.
यावेळी बोलताना प्राचार्य फा. विक्रम शिनगारे म्हणाले की, बालपण हे निरागस व निष्पाप असते. मात्र वाढत्या वयानुसार आयुष्य गुंतागुंतीचे होत जाते. त्यामुळे आयुष्यातील अनमोल ठेवा असणारे हे बालपण आपण मनसोक्त जगायला हवे असे सांगून आपल्यातील लहान मुल आयुष्यभर जीवंत ठेवा व आयुष्याचा आनंद लुटा असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी समन्वयिका मिलाग्रीन कदम, अनिता पाठक, रवि त्रिभुवन, स्वाती डेरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
शेवटी एलिया घागरे या विद्यार्थ्यांने उपस्थितांचे आभार मानले.
*वृत्त विशेष सहयोग*
रवि त्रिभुवन (सर) श्रीरामपूर
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
إرسال تعليق