भारतरत्न मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त सुधीर लंके यांचे व्याख्यान

भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त

सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे होणारे सामाजिक नुकसान व देशापुढील नवीन आव्हाने या विषयावर सुधीरजी लंके यांचे जाहीर व्याख्यान

संगमनेर-- भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त एकता सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने दैनिक लोकमतचे निवासी संपादक सुधीरजी लंके यांचे सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे होणारे सामाजिक नुकसान व देशापुढे नवीन आव्हाने या विषयावरील व्याख्याना बरोबरच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष असिफ शेख यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे डॉ. सुधीरजी तांबे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 25 नोव्हेंबर 2024रोजी सायंकाळी 6ः वाजता जोशी हॉटेलच्या मागे, व्यापारी असोसिएशन हॉलमध्ये होणाऱ्या जयंती सोहळ्यातील  
   जाहीर पुरस्कारामध्ये भारतरत्न मौलाना आझाद आदर्श समाज रत्न पुरस्कार डॉ. सलीम शेख( श्रीरामपूर), आरोग्य मित्र पुरस्कार शहा नवाज शहा( कोपरगाव), आदर्श व्यंगचित्रकार पुरस्कार अरविंद गाडेकर( संगमनेर) स्वर्गीय मिर्झा खालील शेख, आदर्श समाज रत्न पुरस्कार अफसर तांबोळी( संगमनेर) आदी मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविणे येणार आहे कुठलाही प्रस्ताव न मागवता जे समाजासाठी निस्वार्थपणे काम करतात त्यांची संस्था निवड करते हे खास वैशिष्ट्य आहे
 तरीही भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन एकता सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आसिफ शेख, डॉ. जी पी शेख, संग्राम जोंधळे, अनिल भोसले, अब्दुल्ला हसन चौधरी, जाकीर शेख, मुर्तुजा  बोहरी, जुबेद सय्यद, काझीम शेख, शौकत पठाण, बानोबी शेख, सय्यद
असिफअली,इद्रिस शेख,दर्शन जोशी, शानू बागवान, जानकीराम भडकवाड, राजूभाई इनामदार, इरफान शेख, विनोद गायकवाड,  राम सिमरे  आदींनी केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा