भागवताचार्य ह.भ.प. सुवर्णा माई जमधडे यांची पॅरालिसिस केअर सेंटरला सदिच्छा भेट

रामभाऊ आवारे/ निफाड:
तालुक्यातील वनसगांव (ता. निफाड) सारख्या ग्रामीण भागातही आरोग्य बाबत विशेष सुविधा उपलब्ध होऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राम विजय क्लिनिक व पॅरालिसिस केअर सेंटर असुन ग्रामीण ग्रामीण भागात सुरू असलेल्या या दवाखान्याला आपण भेट द्यावी व माहिती जाणून घ्यावी या उद्देशाने महाराष्ट्रातील नामवंत भागवताचार्य सुवर्णामाई जमधडे, ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था सर्वेसर्वा वडगाव (बल्हे) तालुका येवला यांनी सदिच्छा भेट देऊन पॅरालेसिस वर उपचार घेत असलेल्या रुग्णांसंदर्भात विशेष माहिती जाणून घेतली‌.
  राम विजय क्लिनिक व पॅरालिसिस केअर सेंटर मध्ये माफक दरामध्ये पॅरालिसिस रुग्णांवर शिस्तबद्ध व आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची काळजी घेत उपचार केले जातात. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सुप्रसिद्ध भागवताचार्य हभप सुवर्णामाई जमधडे, हभप सौ मोनिका ताई येवले धामोडे,गायनाचार्य दादाभाऊ आहेर खरवंडी यांनी याप्रसंगी भेट दिली असता राम विजय क्लिनिक व पॅरालिसिस केअर सेंटरचे संचालक डॉ योगेश जी डुंबरे यांच्या वतीने वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धी प्रमुख तथा पत्रकार रामभाऊ आवारे सर, वनसगाव सप्ताह समितीचे बाबाजी नाना शिंदे यांच्या शुभहस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
  ग्रामीण भागातही पॅलेसिसवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात ही ग्रामीण भागातील रुग्णांसाठी चांगली सुविधा असून यावेळी त्यांनी संपूर्ण दवाखान्याला प्रत्यक्ष पाहणी करत भोजनालय, कॅन्टीन ,बँकिंग व्यवस्था, पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल, ॲम्बुलन्स, सर्व आरोग्य सेवक, कर्मचारी ,परिसर व वाहन तळ या सर्व ठिकाणी भेट देत समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आहेत.
*संकलन*
समता मिडिया सर्व्हिसेस,
 श्रीरामपूर - ९५६११७४१११

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा