सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी - जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संपुर्णा सावंत

नगर -  मस्साजोग केज बिड येथील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली.या घटनेचा जिजाऊ ब्रिगेड अहिल्यानगर कडून जाहीर निषेध करण्यात आले. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शीवमती संपूर्णा सावंत, उपाध्यक्ष शोभा भालसिंग, तालुका अध्यक्ष सुरेखाताई कडूस,  सचिव वंदना नीगुट,शिलाताई शिंदे,अंमल सासे, सुरेखा सांगळे, स्वाती शेटे पाटील, राजेश्री वणी आदी उपस्थित होते. सदरील हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे.या हत्येमागे एक मोठी बलाढ्य शक्ती आहे. ज्यामुळे समाजातील निरपराध लोकांचा बळी जात आहे.या प्रवृत्तीला वेळीच आवर घातला नाही तर समाजाचा पोलीस यंत्रणेवरील व न्यायपालिकेवरचा विश्वास संपून जाईल.असे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शीवमती संपूर्णा सावंत यांनी सांगितले. या प्रकरणातील दोषींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जिजाऊ ब्रिगेड यांच्यावतीने तहसीलदारां मार्फत निवेदना द्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा