अहमदनगर - मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने अहमदनगर येथील जगप्रसिद्ध मास्टर हबीब निजामी कव्वाल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सोमवार 9 डिसेंबर 2024 रात्री 9 वाजता कॅफे फरहत सीएसआरडी समोर स्टेशन रोड अहमदनगर येथे महफिले मुशायराचे आयोजन करण्यात आले असल्याचे मखदूम सोसायटीच्या सचिव डॉ. कमर सरुर यांनी सांगितले.
या मुशायरा मध्ये अहमदनगर येथील गोरखचंद वर्मा (गोरखपुरी) बिलाल अहमदनगरी, सय्यद खलील, डॉ कमर सुरुर, आसिफ सर, सुलेमान अहमदनगरी, अर्क अहमदनगरी, मुश्ताक सर, शाकीर सर, शरीफ खान, मुन्नवर हुसेन हे आपली शायरी सादर करणार असल्याचे मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान यांनी सांगितले.
या साहित्यिक मुशायऱ्याच्या कार्यक्रमास रसिकांनी उपस्थित रहावे प्रवेश विनामूल्य आहे. असे आवाहन आसिफ सर यांनी केले आहे.
Post a Comment