श्रीसंत गोरा कुंभार यांचे चरित्र आणि अभंग सत्यार्थाने समजून घ्यावे - प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
संत हे सर्व धर्म आणि समाजाचे आदर्श असतात, त्यांचे महत्त्व विज्ञान युगात अधिक लक्षात घ्यावे,श्रीसंत गोरा कुंभार यांच्या चरित्र आणि अभंगांचा मूलभूत अर्थ समजून घेतले पाहिजेत सत्यार्थीने, संशोधनाने हे अर्थ सांगावेत, लिहावे असे मत कोल्हापूर येथील संतसाहित्याचे मर्मज्ञ अभ्यासक माजी प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार यांनी व्यक्त केले.
  श्रीरामपूर जवळील शिसरगांव स्थित इंदिरानगर येथील श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठानतर्फे श्रीसंत गोरा कुंभार यांच्या ७०८ व्या पुण्यतिथीनिमित्त राज्यस्तरीय श्रीसंत गोरा कुंभार सर्वोत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार, छत्रपती संभाजीनगर येथील संतोष लेंभे लिखित 'कृतार्थ' मारोतराव खंडोजी शेंडोकर चरित्र ग्रंथांचे प्रकाशन, प्रबोधक व्याख्याने, समाजातील सेवाभावी व्यक्तींचा सन्मान असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार बोलत होते. अध्यक्षस्थानी स्नेहपरिवार ग्रुपचे अध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. प्रारंभी संत गोरा कुंभार प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षीय सूचना प्रा. सौ. पल्लवी नंदकुमार सैंदोरे यांनी मांडली तर सौ. माधुरी नितीन जोर्वेकर यांनी अनुमोदन दिले. प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मेजर नंदकुमार संतराम सैंदोरे, कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये, कोषाध्यक्षा सौ. मंदाकिनी उपाध्ये, कार्यवाह नितीन जोर्वेकर, सचिव सौ. आरती उपाध्ये यांनी सर्व मान्यवर पाहुणे व उपस्थितींचा सन्मान केला. यावेळी प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार यांच्या' भारतीय कुंभार समाज: शोध आणि बोध' या पाच खंडात्मक प्रकल्प ग्रंथांस प्रतिष्ठानतर्फे श्रीसंत गोरा कुंभार सर्वोत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार व पंचवीस हजारांची देणगी देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथील श्री मारोतराव खंडोजी शेंडोकार यांना श्रीसंत गोरा कुंभार समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. त्यांनी प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार यांच्या ग्रंथकार्यास अकरा हजाराची देणगी दिली.तसेच संगमनेर येथील माजी मुख्याध्यापक द.सा. रसाळगुरुजी यांच्या ' बोधामृत' ग्रंथास आणि प्रा. दिलीप सुखदेव सोनवणे यांच्या' देवमाणसं' ग्रंथास राज्यस्तरीय श्रीसंत गोरा कुंभार सर्वोत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार देण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथील क्षितीज प्रकाशनचे प्रमुख व चरित्रकार संतोष लेंभे यांच्या 'कृतार्थ' ग्रंथास वाचन संस्कृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार आपल्या भाषणात पुढे म्हणाले, श्रीसंत गोरा कुंभार यांच्या चरित्रातील मूल पायी तुडविणे आणि त्यांनी हात तोडणे यांचे भौतिक अर्थ समजून घेतले पाहिजेत. कारण संत गोरा कुंभार यांचा मुलगा मकरेंद्र तरुण वयात संत नामदेवांबरोबर पंजाबपर्यंत धर्मकार्य करीत गेले, त्यांनी२३ अभंग लिहिले. हात वर्ज्य करणे हा अर्थ लक्षात घ्यावा असे सांगून ते म्हणाले, डॉ. बाबुराव उपाध्ये पस्तीस वर्षापासून असा भक्ती साहित्यउपक्रम करीत आहेत. त्यांच्या परिवाराने ही संतसेवा अखंड सुरू ठेवली, हा वाचन संस्कृतीचा  आदर्श जपला पाहिजेअसे आवाहन केले. यावेळी प्रा. दिलीप सोनवणे, द.सा. रसाळगुरूजी, मारोतराव शेंडोकार, विजयराव शेंडोकार, सौ. सिंधुताई शेंडोकार, संतोष लेंभे,ह भ प सोपानराव वेताळ महाराज, प्रा. शिवाजीराव बारगळ, कवी आनंदा साळवे,, पत्रकार, ॲङ बाळासाहेब तनपुरे, शिर्डी येथील दत्तात्रय सोमवंशी आदिंनी आपल्या सत्काराबद्दल आणि उपक्रमांविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी शेंडोकार परिवाराने सर्व मान्यवर पुरस्कार्थी यांचा सन्मान केला. ह.भ.प. सोपानराव वेताळ महाराज यांनी मुक्तीचा मार्ग ही पुस्तके सर्वांना भेट दिली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य शेळके यांनी सांगितले की, उपाध्ये, मांढरे,तुळे, जोर्वेकर, सैंदोरे परिवार गेल्या ३५ वर्षापासून असा साहित्यिक उपक्रम घेत असल्यामुळे अनेक लेखक निर्माण झाले, अनेकांची पुस्तके प्रकाशित झाली, हीच खरी संतांची पूजा आणि पुण्यतिथी होय. ठोस आणि प्रेरणात्मक काम केले तरच समाजाला दिशा मिळते असे सांगून तेर गावातील आपले अनुभव सांगून डॉ. उपाध्ये यांचा सन्मान केला. यावेळी बाबासाहेब यादव, लताताई यादव, लहानू रहाणे, किशोर गाढे, गीतांजली गाढे, फकिरा वाघमारे, सुनंदा वाघमारे, सुभाष मोरे, शोभा मोरे, दत्तात्रय रायपल्ली, सुमनबाई मांढरे, नंदकुमार सैंदोरे, छायाताई सोनवणे, मनिषा रसाळ, सुहासिनी शेंडोकार, लक्ष्मीबाई गाढे, वैशाली गाढे, हेमा भालदंड, उषा सोमवंशी, सुनंदा कारले, रुपाली मोरे, भारत गवळी, केदारीमामा , कृष्णा सैंदोरे, बाबासाहेब चेडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर आरती उपाध्ये यांनी आभार मानले.
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा