विद्यार्थ्यांनो वाहतुकीचे नियम आत्मसाद करा !हल्लीच्या वाढत्या रस्ते अपघातांवर मात करा !!विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाल्याने गुणवत्ता वाढते- समोनि.राणी सोनवणे

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या विविध वेगवेगळ्या स्पर्धामधील यशाबद्दल तालुक्यातील जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूल माळेवाडी या शाळेत नुकताच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सहायक मोटार वाहन निरीक्षक राणी सोनवणे या प्रामुख्याने उपस्थित होत्या तर या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक भागचंद औताडे, श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार पोलीस नाईक किरण टेकाळे, गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई, माजी सरपंच सोपानराव औताडे, उपसरपंच भागुबाई मगन घोडके, आयडीबीआय बँकेचे शाखाधिकारी पवन आत्राम,असिस्टंट मॅनेजर मिथिलेश कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना सुयोग्य मार्गदर्शन करताना सहायक मोटार वाहन निरीक्षक राणी सोनवणे यांनी वाढत्या रस्ते अपघातांवरील नियंत्रण म्हणजेच वाहन चालकांबरोबरच पादचाऱ्यांनी देखील रस्त्याने चालताना घ्यावयाची काळजी तसेच विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम आणि रस्त्यावर चालताना तथा वाहन चालविताना घ्यावयाची खबरदारी याविषयी उपयुक्त माहिती विषद केली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना जर चांगल्या प्रकारचे प्रोत्साहन मिळाले तर निश्चितपणे त्यांची गुणवत्ता वाढते आणि शाळेचा शैक्षणिक आलेख उंचावतो करीता "विद्यार्थ्यांनो वाहतुकीचे नियम आत्मसाद करा !, हल्लीच्या वाढत्या रस्ते अपघातांवर मात करा !!" असेही त्या म्हणाल्या.
 शाळेत घेण्यात आलेल्या अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला संस्कार स्पर्धा परीक्षा मुंबई तसेच साई कलाविष्कार संस्था पुणे यांच्या चित्ररंगभरण परीक्षेत विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, मेडल, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत मिशन आरंभ इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान  करण्यात आला.
जिल्हास्तरावर निवड झालेल्या आणि तालुका स्तरावर प्रथम आलेल्या सांस्कृतिक स्पर्धेतील बालकलाकारांचाही यावेळी गुणगौरव करण्यात आला. केंद्रस्तरीय लांब उडी,उंच उडी,धावणे, कथाकथन, आणि वकृत्वस्पर्धेत केंद्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष भाऊसाहेब ठाकरे,एकनाथ ठाकरे, सराल्याचे सरपंच शंकर विटेकर, किरण बनसोडे, बबन तात्या औताडे,रवींद्र मोहन,प्रकाश मोहन, आशाबाई फुलारे,ताहेर शेख, रामभाऊ वमने, देविदास वमने, वैभव नेद्रे,गणेश लबडे, विजय मोहन, अविनाश उमाप,अंकुश मोहन, सोनल औताडे, मनोज घोडके,सचिन वमने, विलास औताडे, राहुल औताडे, जाकीर शहा, कालिंदी घोडके,रूपाली घोडके, रेश्मा शेख,शीतल ठाकरे, आसाराम लबडे सुवर्ण वमने, सुनीता ठाकरे, शांता मोहन आदी शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक उपक्रमशील शिक्षक श्री. शेख यांनी केले व शेवटी आभार मुख्याध्यापक राजू भालेराव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सारिका लोखंडे, मीरा ससाणे, मीनाक्षी जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
 *वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई
वडाळा महादेव
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा