सोशल मीडियाच्या माध्यमातून वन्यजीवांसाठी पाण्याची सोय ; पोलिस हवालदार श्री.दाणी यांचा स्तुत्य उपक्रम

श्रीरामपुर / प्रतिनिधी:
 पाणी आणि वणवा यामुळे सैरभैर होऊन नगरच्या चांदबीबी महाल परिसरात हरिण, काळवीट, बिबट्या इ. वन्यजीवांचा मृत्यू झाला होता, या घटनेने व्यथित झालेले पोलिस हवालदार श्री.सागर दाणी (नेमणूक - पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान चांदबीबी पुन:प्रक्षेपण केंद्र अहिल्यानगर) त्यांना हे मृत प्राणी डोळ्याने बघवले नाही. तेव्हा त्यांनी प्राण्यांसाठी पाण्याची उपाययोजना करण्याचे ठरवले.              
 सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या संपर्काचा योग्य तो उपयोग करण्याची कला अंगी असण्याचे कसब वापरून संदेश समाजमाध्यमांवर पाठवला तेव्हा महाराष्ट्रातील वन्यप्रेमींनी जवळपास २८ ते ३० हजार आर्थिक मदत पाठवली सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त होणारी आर्थिक मदत व बारदरी मित्र मंडळाच्या सहकार्याने चांदबीबी महाल परिसरात एक मानवनिर्मित तलावाची ८ × १० मीटर लांबी रुंदी असुन साधारण १ फुट खोल असा तयार केलेला आहे. यामध्ये ५ ते ६ हजार लिटर पेक्षा जास्त पाणी बसते. कोणताही वन्यजीव अगदी सहजपणे पाणी पिऊ शकतो किंवा उन्हामुळे त्रासलेला असेल तर तलावात बसु शकतो.
याविषयी पो.हवा. सागर दाणी यांनी सांगितले की, समाजमाध्यमांचा चांगल्या पध्दतीने वापर केला तर काय होऊ शकते हे त्यांच्या कृतीतून पुन्हा एकदा अधोरेखित झालेले आहे. त्यांनी हे संपूर्ण काम आपले कर्तव्य बजावून राहिलेल्या वेळेत केले ही विशेष उल्लेखनीय अशी बाब आहे. 
आज वाढत्या उष्णतेमुळे जंगलातील तसेच ग्रामीण भागातील वन्यजीव प्राणी पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जात आहेत. 
या पार्श्वभूमीवर सर्व निसर्गप्रेमी, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी शक्य असेल अशा रीतीने पक्षी प्राण्यांसाठी पाण्याची सोय करणे गरजेचे असल्याचे फोन कॉल वरुन संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, आज समाज माध्यमावर कोणी सहज बोलून जातो की मुक्या प्राण्यांसाठी काहीतरी करायला हवं, परंतु प्रत्यक्षात करायला कोणीही पुढे धजावत नाही. काही गोष्टी बोलायला सोप्या असतात मात्र करायला प्रत्यक्षात खूप अवघडही असतात. पोलीस हवालदार सागर दाणी या गोष्टीला अपवाद ठरले आहे, यात त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन मनात असलेले काम पूर्ण केले, यासाठी त्यांना विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शाबासकी तसेच वेळोवेळी पाठबळही मिळाले आहे. याकामी सहकार्य करणारे त्यांच्या पोलिस विभागातील सर्व अधिकारी, सहकारी, मित्र, सेवा आर्थिक मदत देणारे सर्व तथा उद्योगपती श्री. सुधीर पोटे या सर्वांचे त्यांनी जाहीर आभार मानले. आम्ही जरी पोलीस दलात कार्यरत असलो तरीही आम्ही सुध्दा भावना असणारे मनुष्य आहोत यासाठी श्रीरामपुर परिसरातील संगीत 
 विशारद अवधुत कुलकर्णी सर यांनीही सहकार्य केले.
या सर्व बाबींचा विचार करून सोशल मिडिया तसेच पो. हवा. श्री दाणी व सर्व मदत करणारे वन्य मित्र यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव 
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा