महाराष्ट्र विधानसभेच्या द्वितीय (पावसाळी) अधिवेशनात अल्पसंख्यांक विकास विभागाच्या "अल्पसंख्यांक संशोधन प्रशिक्षण संस्था (मार्टी)" संदर्भातील अंमलबजावणीतील तिरंगाईबाबत लक्षविधी सूचना / तारांकित प्रश्न उपस्थित करण्याची आमदार अमोल खताळ यांना मागणी

30 जून 2025 रोजी सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या द्वितीय (पावसाळी) अधिवेशनात अल्पसंख्यांक विकास विभागाच्या "अल्पसंख्यांक संशोधन प्रशिक्षण संस्था (मार्टी)" संदर्भातील अंमलबजावणीतील तिरंगाईबाबत लक्षविधी सूचना / तारांकित प्रश्न उपस्थित करण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. 

महाराष्ट्र शासनाने दि.२२ ऑगस्ट २०२४ रोजी "अल्पसंख्यांक संशोधन प्रशिक्षण संस्था (मार्टी)" स्थापना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. ही संस्था राज्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व व्यावसायिक सशक्तीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
या संस्थेसाठी शासनाने ११ पदे मंजूर केली असून एकूण ६.२५ कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला आहे. परंतु आजच्या दिवसापर्यंत ही संस्था अद्याप कार्यक्षम झालेली नाही. कार्यालय सुरू झाले नाही. अधिकारी व कर्मचारी नियुक्ती झालेले नाही आणि योजनेची अंमलबजावणी सुरू झाली नाही.
या दिरंगाईमुळे अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी व युवक यांना शैक्षणिक संधी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शिष्यवृत्ती, पोलीस व सैन्य भरतीसाठीचे प्रशिक्षण, कौशल्य विकास योजना, वस्तीगृहे व निर्वाह भत्त्यांपासून वंचित राहत आहे. 
बार्टि, सारथी, महाज्योती, अमृत, टार्टी या संस्थांच्या धरतीवर "अल्पसंख्यांक संशोधन प्रशिक्षण संस्था (मार्टी)" कार्यरत झाल्यास अल्पसंख्यांक समाजालाही समांतर संधी उपलब्ध होतील.
आपल्याला विनंती- मार्टि संस्थेस स्वतंत्र लेखाशीर्ष (Head) तातडीने मंजूर करावा.
कंपनी कायदा २०१३ च्या कलम-८ अन्वये संस्थेची नोंदणी करावी.
मंजूर पदांवर त्वरित नियुक्त्या कराव्यात.तात्पुरते कार्यालय सुरू करून संस्था कार्यारत करावी.
छत्रपती संभाजी नगर येथे मुख्यालयासाठी आवश्यक निधी मंजूर करावा.येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना लाभ मिळणेसाठी त्वरित अंमलबजावणी करावी.अल्पसंख्याकांसाठी समान लाभाचे धोरण लागू करावे.अशी मागणी आसिफ शेख
(अध्यक्ष, एकता सामाजिक सेवाभावी संस्था) इरफान शेख
सदस्य, शोहेब सय्यद सभासद आदि उपस्थित होते. 

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा